चिमुकल्यांनी साजरी केली लोकमान्य टिळकांची ऑनलाईन पुण्यतिथी

कल्याण : सध्या सर्वत्र कोरोनाचे सावट असल्याने शाळा देखील बंद आहेत. अशातच शनिवारी लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी असल्याने कल्याण मधील बालक मंदिर संस्थेच्या पूर्व प्राथमिक विभागातर्फे लोकमान्य टिळकांची ऑनलाईन पुण्यतिथी साजरी करण्यात आली.   

यावेळी प्रमुख पाहुणे लहू कांबळे सरांनी आपले मनोगत व्यक्त करत मुलांचे खूप कौतुक केले. पाहुण्यांचा परिचय अनुजा पेठे यांनी करून दिला. तर आभार संपदा काणे यांनी मानले. अलका जडे यांनी निवेदन केले. मुख्याध्यापिका विद्या जोशी यांचेही बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. सर्व शिक्षिका,सेविका,शिक्षकेतर कर्मचारी,पालक,आणि भाषणे पाठ करून नवीन माध्यमांसमोर न घाबरता बोलणारे शाळेचे मोठ्या गटाचे विद्यार्थी, शाळेचे हितचिंतक यांच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला. तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचेही बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.

शालेय समिती अध्यक्षा तेजस्विनी पाठक यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनातून ह्या आगळ्या वेगळ्या बालभेतून मुलांनी लोकमान्यांना आदरांजली वाहिली. हा बालसभेचा कार्यक्रम ऑनलाईन लाईव्ह घेतल्याने खूप  जणांना तो बघता आला.