चीनने केलेल्या हल्ल्याचा डोंबिवलीमध्ये व्यक्त करण्यात आला निषेध

डोंबिवली : लडाखमधील गालवान व्हॅली येथे चीन सैन्याने भारतीय जवानांवर केलेल्या क्रूर हल्ल्याचा डोंबिवलीमध्ये निषेध करण्यात आला. यावेळी वीरगती प्राप्त झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यात

 डोंबिवली : लडाखमधील गालवान व्हॅली येथे चीन सैन्याने भारतीय जवानांवर केलेल्या क्रूर हल्ल्याचा डोंबिवलीमध्ये निषेध करण्यात आला. यावेळी वीरगती प्राप्त झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.चीनने केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ चीनचा प्रतिकात्मक राष्ट्रध्वज जाळून रोष व्यक्त करण्यात आला.

यावेळी भाजयुमो डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्ष मिहिर देसाई यांनी सांगितले की, या आव्हानात्मक प्रसंगी सर्व भारतीय तरुण, भारत सरकार आणि भारतीय जवानांसोबत आहेत. शहीद जवानांच्या कुटुंबासोबत आमच्या संवेदना आहेत. चीन असो वा पाकिस्तान, घुसखोरी आणि दहशतवाद या द्दल आपले ‘झिरो टॉलरन्स’ हेच धोरण असले पाहिजे. यावेळी कार्यालयमंत्री सौरभ ताम्हणकर, अथर्व ताडफळे, मंदार जोशी, रोहन देसाई, राजा सिंघानी, श्रेयस मानकामे, चिन्मय कामतेकर, भूषण देव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.