भिवंडीतील चिंचोटी मानकोली रस्त्याची दुरवस्था

भिवंडी: भिवंडीतील चिंचोटी अंजुरफाटा ते मानकोली या रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून या रस्त्यावर टोल वसूल करणाऱ्या ठेकेदाराचे इथे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. गेल्या

 भिवंडी: भिवंडीतील चिंचोटी अंजुरफाटा ते मानकोली या रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून या रस्त्यावर टोल वसूल करणाऱ्या ठेकेदाराचे इथे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याकडे टोल कंपनीने दुर्लक्ष केल्याने या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत धरूनच या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र तरीदेखील रस्त्यांची आवश्यक कामे पूर्ण करण्याच्या सूचना राज्य शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागासह सर्वच टोल कंपन्यांना दिले आहेत. मात्र या रस्त्यावर टोल वसुली करणाऱ्या सुप्रीम कंपनीने रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याने अंजुरफाटा ते खारबावपर्यंत महामार्गावर मोठे खड्डे पडले असून वडघर येथे रस्ता पूर्णतः नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावर अपघात होऊन नागरिकांचा जीव जाण्याची शक्यता निर्माण झाली असून अंजुरफाटा ते खारबावपर्यंतचा नादुरुस्त रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.