cidco

    नवी मुंबई : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सिडकोच्या घरांची ४० घरांची योजना जाहीर करणार आहे. केंद्र सरकारच्या हाऊस फॉर ऑल या धोरणानुसार सिडकोने चालू वर्षात ८८,९६१ घरे बांधण्याचा निर्धार केला आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात चाळीस हजार घरे बांधली जाणार आहेत.

    सिडकोने मागील दोन-अडीच वर्षांत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सुमारे २४ हजार घरांची योजना जाहीर केली. संगणकीय सोडतीत यशस्वी ठरलेल्या ग्राहकांना कागदोपत्री संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ताबापत्रेही वाटप करण्यात आली आहेत. परंतु कोरोना आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे पात्रताधारकांना अद्यापी प्रत्यक्ष घरांचा ताबा मिळालेला नाही. असे असतानाच सिडका आणखी ४० हजार घरांच्या योजनेची घोषणा करण्याची शक्यता आहे.

    नवी मुंबईसह पनवेल आणि उरण परिसरात ही घरं बांधली जाणार आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील घरांचा यात समावेश आहे. यातील ३५ टक्के घरे पंतप्रधान आवास योजनेसाठी असणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती ही घर करणार आहेत.