सततच्या विजेच्या लपंडावाला कंटाळून नागरिकांनी महावितरण कार्यालयावर काढला मोर्चा

कल्याण : गेले अनेक दिवस डोंबिवली एमआयडीसी भागात सतत वीज पुरवठा खंडीत होत विजेचा लपंडाव सुरु असल्याने अखेर संतप्त नागरिकांनी महावितरणचा कार्यालयावर धडक मोर्चा काढलायावेळी नागरिकांनी उपकार्यकारी

कल्याण : गेले अनेक दिवस डोंबिवली एमआयडीसी भागात सतत वीज पुरवठा खंडीत होत विजेचा लपंडाव सुरु असल्याने अखेर संतप्त नागरिकांनी महावितरणचा कार्यालयावर धडक मोर्चा  काढलायावेळी नागरिकांनी उपकार्यकारी अभियंता यांना याबाबत जाब विचारला.  निसर्ग चक्रीवादळाचे कारण सांगून काल सकाळपासून वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. मात्र सायंकाळपर्यंत वीजपुरवठा सुरू न झाल्याने नागरिकांनी महावितरणचा अभियंत्यांना फोन केले. मात्र नेहमीप्रमाणे त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. या प्रकारामुळे नागरिक खूप चिडले होते. रात्री दहाच्या दरम्यान काही ठिकाणी वीज पुरवठा पूर्ववत झाला नव्हता. तर  काही ठिकाणी आज  दुपारी एक वाजेपर्यंत वीज पुरवठा पूर्ववत झालेला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून निवासी परिसरात वीजपुरवठा बंद होण्याचे प्रमाण वाढले असून केबल फॉल्ट, ट्रान्सफॉर्मरला आगी लागणे, स्पार्क होणे, ट्रान्सफॉर्मर मधुन स्फोटासारखा आवाज येणे अशा अनेक कारणांमुळे वीज पुरवठा खंडीत होत आहे. महावितरणचा एमआयडीसी कार्यालयाचा आवारात अनेक वर्षांपासून दरवर्षी पाणी भरते. त्यामुळे वीज ग्राहकांना व कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे. यावरही महावितरण काहीही करीत नाही.  नागरिकांनी लॉकडाऊन असूनही त्रास असह्य झाल्याने महावितरण कार्यालयावर येऊन आपला राग व्यक्त केला. यावेळी धर्मराज शिंदे, नंदू परब, राजू नलावडे, करिष्मा प्रताप, उल्हास सावंत, रामदास मेंगडे, मोहन पुजारे, मनोहर पाटील, माटल, दुर्वाकुर जोशी इत्यादी नागरिकांबरोबर उपस्थित होते.