bathroom

पश्चिमकडील शास्त्रीनगर हॉस्पिटलच्या मागील बाजूस महापालिकेच्या जागेत सुलभ शौचालय होते. त्या शौचालयच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मागील अनेक वर्षे शौचालय धोकादायक अवस्थेत होते. विभागातील नागरिकांनी पालिकेकडे तसेच लोकप्रतिनिधीकडे अनेकवेळा तक्रारी केल्या. धोकादायक अवस्थेतील त्या शौचालयावर गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांनी वहिवाट चालवली होती.

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर (KDMC) पालिका प्रशासनाला नागरिकांच्या समस्यांची जाणीव होऊ लागली आहे. गेली ३० वर्षे धोकादायक अवस्थेत असणारे शौचालय अखेर नागरिकांच्या रेट्यामुळे आणि नगरसेविका वृषाली रणजित जोशी यांच्या सततच्या प्रत्नाने जमीनदोस्त करण्यात आले. त्याच ठिकाणी आता नवीन अद्ययावत शौचालय पालिका बांधणार (new convenient toilets) असून विभागातील नागरिकांना त्याचा लाभ घेता येणार आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून शौचालयाची देखभाल होणार असल्याने शौचालयाची स्वच्छता राखली जाईल असा विश्वास माजी नगरसेवक रणजित जोशी यांनी व्यक्त केला.

पश्चिमकडील शास्त्रीनगर हॉस्पिटलच्या मागील बाजूस महापालिकेच्या जागेत सुलभ शौचालय होते. त्या शौचालयच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मागील अनेक वर्षे शौचालय धोकादायक अवस्थेत होते. विभागातील नागरिकांनी पालिकेकडे तसेच लोकप्रतिनिधीकडे अनेकवेळा तक्रारी केल्या. धोकादायक अवस्थेतील त्या शौचालयावर गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांनी वहिवाट चालवली होती. त्याच्या बाजूलाच वडापाव टपरी आणि मोकळ्याजागेवर काही फेरीवाले अतिक्रमण करण्याच्या प्रयत्नात होते. पालिकेच्या “ह” प्रभाग समिती सभापती नगरसेविका वृषाली जोशी यांनी याबाबत पालिकेस पत्रव्यवहार करून या ठिकाणी अद्ययावत नवीन शौचालय करण्याची मागणी कर्ली होती.

पालिका प्रशासनाने मागणीचा विचार करून बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या विषयाच्या त्या जागेवर आठ सीटचे शौचालय करण्यासाठी निविदा काढून हा प्रश्न मार्गी लावला. अखेर मंगळवारी सकाळी जेसीपीच्या साहाय्याने ते धोकादायक शौचालय जमीनदोस्त करण्यात आले. “ह” प्रभागक्षेत्र अधिकारी भरत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जागा मोकळी करण्यात आली. सदर ठिकाणी आता नवीन सुलभ शौचालय होणार असून त्याचा शास्त्रीनगर, सखारामनगर, जुनीडोंबिवली येथील नागरिकांना होणार आहे. अनेक वर्षांची मागणीकडे पालिका प्रशासनाने लक्ष देऊन काम केल्याबद्दल रणजित जोशी यांनी धन्यवाद व्यक्त केले आहेत.