dombivali beat marshal

डोंबिवली : एकीकडे महिला सक्षमीकरणासाठी सरकार कडक पाउले उचलत असताना दुसरीकडे महिलांना आपले रक्षण करण्यासाठी ‘रणरागिणी’चे रूप धारण करावे लागण्याची घडना डोंबिवलीत घडली आहे.

डोंबिवली : एकीकडे महिला सक्षमीकरणासाठी सरकार कडक पाउले उचलत असताना दुसरीकडे महिलांना आपले रक्षण करण्यासाठी ‘रणरागिणी’चे रूप धारण करावे लागण्याची घडना डोंबिवलीत घडली आहे.

कल्याण डोंबिवली(kalyan dombivali) पालिकेच्या स्वच्छता मार्शल महिला(cleanup marshal woman) कारवाई करत असताना दारू प्यायलेल्या इसम अंगावर आल्याने आपल्या बचावासाठी महिलेने आपल्याजवळील चावी त्या इसमाच्या पोटात खुपसली. यात इसम जखमी होऊन तो पुन्हा तिच्या अंगावर धावत जाऊन तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत होता. हा प्रकार सुरु असताना जमलेले लोक तिला वाचवण्यासाठी पुढे आले नाही. पूर्वेकडील सावरकर रोडवरील जुन्या रामचंद्र टाॅकीज जवळील रस्त्यावर घडलेल्या या प्रकाराची माहिती डोंबिवली रामनगर पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहचले. त्यांनी या महिलेला पोलीस ठाण्यात आणले तर जखमी इसमावर पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

रस्त्यावर कचरा टाकण्यास बंदी असल्याने कचरा टाकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांकडून देण्यात आले आहे. पालिकेने यासाठी स्वच्छता मार्शलला तसे अधिकारी दिले आहेत. गुरुवारी सावरकर रोडवरील एका रस्त्याच्या कडेला एक महिला कचरा टाकत असताना स्वच्छता महिला मार्शलने तिला दंडात्मक कारवाई केली. ही महिला दंडाची रक्कम ३०० रुपये भरण्यास तयार असताना अचानक विजय मोरे ( ४०, रा.आजदेगाव ) या दारू प्यायलेल्या इसमाने स्वच्छता मार्शल महिलेला अटकाव करत का कारवाई करता असा दम भरला.

स्वच्छता मार्शल महिलेने त्यास कारवाईमध्ये पडू नका सांगितले. मात्र विजय याने महिलेशी वाद घालण्यास सुरुवात केली. काही वेळाने विजयने तिच्या अंगावर जाऊन तिचे ओळखपत्र फाडले. त्यामुळे आत्मरक्षणासाठी स्वच्छता मार्शल महिलेने तिच्याजवळील चावी विजयच्या पोटात खुपसली. आपल्याला मारल्याचा राग आल्याने त्याने महिलेला गळा आवळायचा प्रयत्न केला. ही सर्व घटना काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद करून सोशल मिडीयावर व्हायरल केली. या घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन  स्वच्छता मार्शल महिलेला पोलीस ठाण्यात आणले तर जखमी विजय मोरे याला उपचारासाठी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरिक्षक( गुन्हे ) नारायण जाधव करत आहेत.