दहा हजारांची लाच मागणाऱ्या लिपिकास अटक, स्टेट ब्रोकरवर दिला कारवाईचा इशारा

ठाणे महापालिकेच्या (TMC) स्थावर मालमत्ता विभागातील लिपिकास (Clerk ) लाच स्वीकारताना रंगेहात अटक (Arrest) करण्यात आली. हेमंत शरद गायकवाड (Hemant Gaikwad) (३३) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर लिपिकाचे नाव आहे.

ठाणे : स्टेट ब्रोकरवर (state broker) कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ठाणे महापालिकेच्या (TMC) स्थावर मालमत्ता विभागातील लिपिकास (Clerk ) लाच स्वीकारताना रंगेहात अटक (Arrest) करण्यात आली. हेमंत शरद गायकवाड (Hemant Gaikwad) (३३) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर लिपिकाचे नाव आहे.

या घटनेतील तक्रारदार स्टेट ब्रोकर असून त्यांनी बारमध्ये काम करणाऱ्या मुलींना ठाण्यातील चितळसर मानपाडा येथील दोस्ती इंपेरियर येथे रूम भाड्याने घेऊन दिला होता. सदर मुलींना रूम भाड्याने घेऊन दिला म्हणून ठाणे महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागात लिपिक पदी काम करणारे हेमंत गायकवाड यांनी ब्रोकरवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. ही कारवाई न करण्यासाठी गायकवाड यांनी १० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

या प्रकरणी स्टेट ब्रोकर यांनी ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर एसीबी पथकाने सापळा रचून गायकवाड यास १० हजाराची लाच स्वीकारताना कोर्टनाका परिसरात अटक केली. या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.