वेतन मागण्यासाठी कामगार कोका कोला कंपनीबाहेर होतायत जमा ,कामगार आणि कंपनीत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू

वाडा: वेतन मिळावे,या मागणीसाठी पालघर जिल्ह्यातील कुडूस इथल्या शीतपेय बनविणाऱ्या कोका कोला कंपनीच्या गेटजवळ कामगार एकत्रित जमा झाले आहेत. तर कामगार प्रतिनिधी, पोलीस प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापन

वाडा: वेतन मिळावे,या मागणीसाठी पालघर जिल्ह्यातील कुडूस इथल्या शीतपेय बनविणाऱ्या कोका कोला कंपनीच्या गेटजवळ कामगार एकत्रित जमा झाले आहेत. तर कामगार प्रतिनिधी, पोलीस प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात सध्या चर्चा सुरु आहे. यावर कंपनी व्यवस्थापन या ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांविषयी काय भूमिका घेते यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कुडूस येथे शीत पेये बनविणारी मल्टी नॅशनल कोकाकोला कंपनी आहे. या ठिकाणी स्थानिक कामगार वर्गाचा मोठा भरणा आहे. रोजगाराचे साधन म्हणून या परिसरात या कंपन्यांकडे पाहिले जाते. बाकी परिसरात स्टील रोलिंग मिल, केमिकल इतर उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत. कोरोनाच्या पार्श्भूमीवर लॉकडाऊन झाले आणि या कंपनीतील काही कामगार घरी बसले.पण कोका कोला कंपनीचे उत्पादन काही अटी शर्तींवर चालू ठेवण्यात आले. या कंपनीत हेल्पर म्हणून काम करणारा कामगारवर्ग हा ३०० हून अधिक आहे. तो ठेकेदारीच्या माध्यमातून काम करतोय. लॉकडाऊन झाले. एप्रिलपर्यंतचा कंपनी कडून पगार मिळाला नाही, अशी माहिती कामगार वर्गाकडून देण्यात येतेय.दोन दिवस झाले हे कामगार कंपनीच्या गेटजवळ जमत आहेत. तर कंपनी या कामगारांना ८० टक्के  पगार देत असल्याचे आणि काही अडचणीच्या कारणाने कामावर न येणाऱ्या कामगाराचा पगार देत नाही असे कामगार वर्गाकडून सांगितले जाते. यावर  ८० टक्के पगार नको आणि घरी असणाऱ्या कामगारालापण पगार द्यावा, अशी मागणी होतेय. तर यावर स्थानिक कामगार संघ युनियनचे कामगार प्रतिनिधी महेंद्र गायकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आमच्या युनियनमध्ये ३३० कामगार आहेत.कंपनीकडून या सगळ्या कामगारांना एप्रिल महिन्याचा पगार मिळाला पाहिजे. मग यात लॉकडाऊन काळात घरी बसलेला असो की कामावर येणारा कामगार असो असे त्यांनी बोलताना सांगितले.

दरम्यान, याबाबत कंपनीकडून कोणी यावर अधिकृत बोलायला तयार नाही पण कामगार आणि कंपनीची बोलणी चालू आहे. त्यानंतरच बोलता येईल असे एका कंपनीमधील एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. देशात आणि राज्यात आज घडीला सर्वत्र लॉक डाऊनमुळे कंपनीचा उत्पादित मालाला खप नाही आणि काही कंपन्या उत्पादना अभावी अडचणीत सापडला आहे. कामगारही वेतना अभावी हा लॉकडाऊनचा कालावधी कसा काढेल? ही चिंता कामगार वर्ग व्यक्त करताना दिसतोय.  त्यामुळे कामगार आणि कंपनी यांच्यात दुहीचे चित्र सध्या निर्माण होत आहे.