वेबिनारच्या माध्यमातून जिल्हाधिकारी एकाच वेळी साधणार जिल्ह्यातल्या सर्व यंत्रणेशी संवाद

पालघर : पालघर जिल्हयात मोठया प्रमाणात कोरोनाची बाधा झालेले रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी वेबिनार कार्यक्रमाच्या माध्यमातून १० आणि ११ जून असे २ दिवस

 पालघर : पालघर जिल्हयात मोठया प्रमाणात कोरोनाची बाधा झालेले रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी वेबिनार कार्यक्रमाच्या माध्यमातून १० आणि ११ जून असे २ दिवस सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत एकाच वेळी जिल्ह्यातील सर्व यंत्रणेशी संवाद साधणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या असून त्या अनुषंगाने पालघर जिल्हयातल्या पीक कर्जवाटप , पीकविमा , मनरेगा , कोरोना प्रादुर्भाव व्यवस्थापन , अन्नधान्य वाटप आणि  शैक्षणिक वर्षासाठी शाळा सुरु करण्याबाबतच्या योजनांचा आढावा घेऊन जिल्ह्यातल्या सर्व यंत्रणेला निर्देश देण्यासाठी आरोग्य अधिकारी, बालविकास अधिकारी, ग्रामपातळीवरील सरपंच, ग्रामसेवक, कृषि सहायक, बँकेचे अधिकारी, विकास सेवा संस्थेचे सचिव / चेअरमन , तलाठी, मुख्याधापक, पोलीस पाटील, आरोग्य सेविका, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, जल सुरक्षक, वनरक्षक, प्रत्येक ग्रामपंचायतीमधील ५ शेतकरी गटातले गट प्रमुख यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी शिंदे यांनी सांगितले. 

या सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे वेबिनार कार्यक्रमाच्या दिवशी दिलेल्या वेळेत गावपातळीवर उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत. यावेळी उपस्थितांनी मास्क , सॅनिटायझर , सामाजिक अंतर  याचा वापर करणे बंधनकारक राहिल. या व्यतिरीक्त स्थानिक लोकप्रतिनीधी आणि इतर नागरीक या कार्यक्रमात सहभाग घेवू इच्छित असल्यास त्यांनी सामाजिक अंतर पाळून कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी  केले आहे