नाले सफाई, कोपर ब्रीज, वडवली उड्डाणपुलाच्या कामाचा आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी यांनी केला पाहणी दौरा

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाई तसेच कोपर ब्रीज, प्रलंबित वडवली उड्डाणपुलाच्या कामाचा पाहणी दौरा कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी, शहर अभियंता सपना

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाई तसेच कोपर ब्रीज, प्रलंबित वडवली उड्डाणपुलाच्या कामाचा पाहणी दौरा कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी, शहर अभियंता सपना कोळी यांनी केला. येवू घातलेल्‍या पावसाळयाच्‍या पार्श्‍वभूमीवर कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे सुरु असून महापालिका आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी व शहर अभियंता सपना कोळी यांनी मंगळवारी सायंकाळी महापालिका क्षेत्रातील नालेसफाईच्‍या कामांची पाहणी संबंधित अधिका-यांसोबत केली. कल्‍याण (प) येथील शहाड अंबिकानगर नाला, मिलींद नगर, घोलप नगर नाला, जरीमरी नाला, कल्‍याण (पूर्व) लोकधारा नाला, खडेगोळवली नाला तसेच डोंबिवली विभागातील गांधीनगर नाला इ. नाल्‍यांची आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पाहणी केली. व नाले सफाईच्‍या कामात गती वाढवून सफाईची कामे तातडीने पूर्ण करणे, नाल्‍यातून काढलेला गाळ उचलणेबाबत सुचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्‍या.

कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ९८.११ कि.मी. लांबीचे ९३ मोठे नाले आहेत. त्‍यातील मुख्‍य नाल्‍याची साफसफाईची कामे पोकलेन, जेसीबी व कामगारांच्‍या मदतीने सुरु आहेत. आजतागायत ३० टक्‍के नालेसफाईची कामे पूर्ण झालेली आहेत. पुढील १५ दिवसांमध्ये नालेसफाईची कामे पूर्ण करण्याबाबतचे निर्देश पालिका आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

 पालिका आयुक्‍त डॉ.विजय सूर्यवंशी व शहर अभियंता सपना कोळी (देवनपल्‍ली) यांनी कोपर ब्रिज कामाची व वडवली ब्रिजच्‍या कामाचीदेखील पाहणी केली. कोपर ब्रिजच्‍या पुढे रेल्‍वे ट्रॅकपर्यंत तोडण्‍याचे काम वेळेत पूर्ण करण्याबाबतचे निर्देश त्‍यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. वडवली उड्डाणपुलाचे काम सन २०१० पासून प्रलंबित आहे, त्‍यामुळे लॉकडाऊनच्‍या काळातसुद्धा या पुलाचे काम सुरु करण्‍यास पालिका आयुक्‍तांनी विशेष परवानगी दिली. ९ मे रोजी पुलाच्‍या शेवटच्या स्‍लॅबचे काँक्रीटीकरण करण्‍यात आले आहे. भरीव पोहच रस्‍ते , सुरक्षात्‍मक कठडा व पुलावरील डांबरीकरण इत्‍यादी कामे पुढील चार महिन्‍यात पुर्ण करण्‍याचे प्रशासनाचे नियोजन आहे.