भिवंडी पालिका कर्मचाऱ्यांच्या कर्जाच्या हप्त्यांची कपात न करण्यासाठी काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना साकडे

भिवंडी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या ३ महिन्यांच्या कर्जाच्या हप्त्यांची रिझर्व्हबँक ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार पगारातून कपात करू नये, अशी मागणी ठाणे

 भिवंडी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या ३ महिन्यांच्या कर्जाच्या हप्त्यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार पगारातून कपात करू नये, अशी मागणी ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी पंकज गायकवाड यांनी प्रांताधिकारी डॉ. मोहन नळदकर यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. शहर महानगरपालिकेतील कर्मचारी कोरोनासारख्या भयानक संकटाला तोंड देत आपले कर्तव्य बजावत आहेत.कोरोनामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसह सर्वच नागरिकांची आर्थिक कोंडी झालेली आहे.त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी भारतिय रिझर्व्ह बँकेने खाजगी बँका,पतपेढ्यांना ३ महिन्यांसाठी गृहकर्ज ,वाहन कर्ज अथवा अन्य कर्जाचे हप्ते न घेण्याचे आदेश दिले आहेत. पण याचे पालन फक्त कल्याण,ठाणे,मुंबई आदी महानगरपालिकांनी केले असून भिवंडी महानगरपालिकेने सुद्धा याचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र तसे भिवंडी पालिकेत होताना दिसत नाही.कामगारांच्या बँक खात्यातून परस्पर कर्जाचे हप्ते कापले जात आहेत. या कोरोना संकटाच्या काळात कामगारांकडे दोन पैसे हाती असावेत, असे रिझर्व्ह बँकेचे मत आहे. मात्र येथील प्रशासन तसे करताना दिसत नसल्याने आपण यावर त्वरीत आदेश देऊन पालिका कर्मचाऱ्यांच्या पगारातून कर्जाचे हप्ते कापण्यास प्रतिबंध करून कर्मचाऱ्यांना दिलासा देऊन राज्य सरकार संकटाच्या काळात कामगारांसोबत असल्याचा विश्वास निर्माण करावा, असे साकडे ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी पंकज गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.