congress thane program

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या(Indian national congress) १३६ व्या वर्धापन दिन ठाण्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी(congress workers) उपस्थिती दर्शविली होती. मात्र या कार्यक्रमात अनेक कार्यकर्ते विनामास्क आढळून आले.

ठाणे: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या(Indian national congress) १३६ व्या वर्धापन दिन ठाण्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी(congress workers) उपस्थिती दर्शविली होती. मात्र या कार्यक्रमात अनेक कार्यकर्ते विनामास्क आढळून आले. त्यामुळे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कोरोनाचा विसर पडला का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

दरम्यान यावेळी वर्धापन दिन साजरा करण्याचा आनंद असला तरी ठाण्यातील काँग्रेसचं असलेले अस्तित्व अधिकाधिक मजबूत करण्याच्या दृष्टीकोनातून आपण किती सक्रीय आहोत यांचा विचार कार्यकर्त्यांनी केला पाहिजे. तसेच ठाण्यात काँग्रेसचे अस्तित्व अधिकाधिक मजबूत करणार असल्याचे काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष तथा विक्रांत चव्हाण यांनी सांगितले आहे.

काँग्रेसमधील प्रत्येक सेल, प्रत्येक विभाग मजबूत होणे गरजेचे असून लवकरच एक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याचे ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. विक्रांत चव्हाण यांनी सांगितले. या कार्यक्रमात अनेक कार्यकर्ते विनामास्क पाहायला मिळाले असून कोरोनाचे गांभीर्य नसल्याचे यावेळी दिसून आले.

अखिल भारतीय काँग्रेसचा १३६ व्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचा इतिहास यावर मार्गदर्शन करताना विक्रांत चव्हाण बोलत होते. याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की, देशाच्या पातळीवर काय चाललंय यावर चर्चा करण्यापेक्षा आम्ही ठाण्यातील काँग्रेससाठी काय करतोय यावर विचार मंथन झाले पाहिजे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत आपण कशा पद्धतीने यशस्वी होऊ शकतो यांची आखणी केली पाहिजे, असे देखील चव्हाण यांनी सांगितले. या प्रसंगी जेष्ठ नेते राम भोसले,महेंद्र म्हात्रे, सुरेश खेडे पाटील व मोहम्मद अब्दुल्ला यांनी काँग्रेस इतिहासावर आपले विचार मांडले.

राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेत असला तरी मात्र ठाण्यात काँग्रेसला हवे तर बळ मिळाले नाही. किंबहुना गेल्या अनेक वर्षात ठाणे काँग्रेसला अपयश हाती आले आहे. ठाण्यात काँग्रेसला एका मजबूत नेत्यांची गरज असून भविष्यात येऊ घातलेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणूका लक्षात घेता ठाण्यात काँग्रेसचे बळ वाढवण्यासाठी नेते तसेच कार्यकर्त्यांनी अपार कष्ट घेण्याची गरज आहे.१३६ व्या वर्धापनदिन काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी एक मजबूत फळी उभारण्याची गरज भासली आहेत.