कोरोना रुग्णांची घटती संख्या पाहता ठाणे पालिकेने काही कोरोना केंद्र बंद करावीत – भाजपची मागणी

ठाणे : कोरोना रुग्णांची घटती संख्या लक्षात घेऊन, खर्चात बचत म्हणून नवी मुंबई व भिवंडी महापालिकेच्या धर्तीवर ठाणे महापालिकेने उभारलेली काही कोरोना हॉस्पिटल, कोरोना सेंटर आणि क्वारंटाईन सेंटर तात्पुरती बंद करावीत(demand to close some quarantine centers of thane), अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे केली आहे.

ठाणे : कोरोना रुग्णांची घटती संख्या लक्षात घेऊन, खर्चात बचत म्हणून नवी मुंबई व भिवंडी महापालिकेच्या धर्तीवर ठाणे महापालिकेने उभारलेली काही कोरोना हॉस्पिटल, कोरोना सेंटर आणि क्वारंटाईन सेंटर तात्पुरती बंद करावीत(demand to close some quarantine centers of thane), अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे केली आहे. घटत्या रुग्णसंख्येमुळे शहरातील रुग्णांच्या सुविधेसाठी १००० खाटांचे बाळकूम येथील विशेष कोविड रुग्णालय व ७१६ बेडचे भाईंदरपाडा क्वारंटाईन केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू ठेवावे, असे डुंबरे यांचे म्हणणे आहे.

ठाणे महापालिकेतर्फे सध्या बाळकूम येथील ग्लोबल कोविड विशेष रुग्णालय, कौसा स्टेडियम हॉस्पिटल आणि भूमिपूत्र हॉस्पिटल कार्यरत आहेत. त्यात बाळकूम रुग्णालयात ८२५, कौसा येथे ३४६ आणि भूमिपूत्र येथे ५८० बेड रिकाम्या असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. तर क्वारंटाईन सेंटरमध्ये भाईंदरपाडा येथे ७१६ पैकी केवळ १५९, कौसा स्टेडियम येथे २०० पैकी ७४ रुग्ण क्वारंटाईन आहेत.

कोरोनाच्या घटत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर, नवी मुंबई महापालिकेने तीन कोविड केंद्रे तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भिवंडीतही अशाच प्रकारे तात्पुरत्या स्वरुपात केंद्रे बंद केली जात आहेत. त्यातून लाखो रुपयांची बचत होणार आहे. सध्या ठाणे महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. कोरोनाच्या फटक्यामुळे मोठ्या प्रमाणावर अर्थसंकल्पात तूट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बचतीचे उपाय हाती घेण्याची नितांत आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर तूर्त ठाणे महापालिकेने १०२४ बेडचे कोविड हॉस्पिटल व भाईंदरपाडा येथील ७१६ रुग्णक्षमतेचे क्वारंटाईन केंद्र सुरू ठेवण्याबाबत गांभीर्याने विचार करायला हवा. शहराच्या विविध भागात आढळणाऱ्या रुग्णांना दोन्ही ठिकाणी दाखल करता येईल, असे डुंबरे यांनी म्हटले आहे.