मनसैनिकांना दिलासा, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना जामीन

  • आज न्यायालयात अविनाश जाधव यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. तसेच न्यायाधीश पी पी जाधव यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद एकूण घेतला. या युक्तिवादाच्या आधारे न्यायाधिशांनी अविनाश यांचा जामीन मंजूर केला आहे. परंतु जाधव यांना सोमवारी पोलीस स्थानकात हजेरी द्यावी लागणार आहे.

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ३१ जूलै रोजी ठाण्याच्या कापुरबावडी पोलीसांनी अटक केली होती. ठाणे महानगरपालिकेच्या समोर नर्सेस आंदोलन प्रकरणी त्यांना अटक केली होती. शुक्रवारी ८ जुलै न्यायालयाने त्यांच्या जामीन मंजूर केला आहे. 

अविनाश जाधव यांनी मागील महिन्यात वसई पालिका आयुक्त दालन आंदोलन प्रकरणात त्यांना तडीपारची नोटीस बजावली होती. तसेच ठाण्यातील खंडणीविरोधी विभागाने अविनाश जाधव यांना ३१ जुलैला ताब्यात घेतले होते. अविनाश जाधल यांनी सोमवारी ठाणे दिवणी न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. ठाणे पोलीसांनी न्यायालयात अधिकचा कालावधी मागितला होता. 

आज न्यायालयात अविनाश जाधव यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. तसेच न्यायाधीश पी पी जाधव यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद एकूण घेतला. या युक्तिवादाच्या आधारे न्यायाधिशांनी अविनाश यांचा जामीन मंजूर केला आहे. परंतु जाधव यांना सोमवारी पोलीस स्थानकात हजेरी द्यावी लागणार आहे. 

अविनाश जाधव यांना सरकारी कामांत अडथळा आणत आंदोलने केल्यामुळे २ वर्षांसाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड या पाच जिल्हांमधून तडिपार होण्याची नोटीस बजावली होती.