राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियानामध्ये भिवंडीकरांनी अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन

भिवंडी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास १० जून रोजी २१ वर्ष पूर्ण झाली असून त्या प्रित्यर्थ राज्य पातळीवर राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियान सुरू करण्यात आले असून त्यामध्ये भिवंडी शहरातील जास्तीत

 भिवंडी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास १० जून रोजी २१ वर्ष पूर्ण झाली असून त्या प्रित्यर्थ राज्य पातळीवर राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियान सुरू करण्यात आले असून त्यामध्ये भिवंडी शहरातील जास्तीत जास्त नागरीकांनी आपले अभिप्राय नोंदवून पक्ष बळकटीस हातभार लावावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष भगवान टावरे यांनी आवाहन केले आहे . राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या पक्षाने अवघ्या आठ महिन्यात सत्तेला गवसणी घातली . तेव्हापासून २१ वर्षाच्या कार्यकाळात पक्ष मजबूत होत महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यात यशस्वी झाला असून पक्षातर्फे अभिप्राय अभियान जे राबविले जाणार आहे त्यामध्ये शहरातील पक्ष कार्यकर्ते ,पक्षावर प्रेम करणारे नागरीक ऑनलाईन पद्धतीने https://bit.lyRashtravadiPakshAbhipraay या लिंक वर नोंदवीत असताना पक्ष कडून असलेल्या अपेक्षा, परिसरातील समस्या नोंदविल्यास त्याचा समावेश  पक्षाची भविष्यातील ध्येयधोरणे ठरविताना केला जाईल असा विश्वास भगवान टावरे यांनी व्यक्त केला या प्रसंगी सरचिटणीस अॅड सुनील पाटील ,प्रणित टावरे ,अरुण गरडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते .