Mansukh Hiren Death Case : वादग्रस्त सचिन वाझे यांना अटक होणार? ठाणे सत्र न्यायालयात केला होता अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

पुन्हा १९ मार्चला सुनावणी होणार असून यामध्ये न्यायालय हे एटीएस तपास यंत्रणेचेही म्हणणे ऐकून घेणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सचिन वाझे यांना अटक होण्याची शाश्वती वाढलेली आहे. वाझे यांना अटक करून मगच जामीन मिळवावा लागणार आहे.

  ठाणे : मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास करणाऱ्या एटीएस यंत्रणेने हत्येचा गुन्हा दाखल केल्याने अटक होण्याच्या उंबरठ्यावरील सपोनि सचिन वाझे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटक पूर्व जामीन अर्ज केला होता. सदर अर्जाचे परीक्षण केल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती शैलेंद्र तांबे यांनी मात्र अटकपूर्व जामीन देता येणार नसल्याचे सांगितले. अन सचिन वझे यांचा जामीन अर्ज फेटाळला.

  त्यावर पुन्हा १९ मार्चला सुनावणी होणार असून यामध्ये न्यायालय हे एटीएस तपास यंत्रणेचेही म्हणणे ऐकून घेणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सचिन वाझे यांना अटक होण्याची शाश्वती वाढलेली आहे. वाझे यांना अटक करून मगच जामीन मिळवावा लागणार आहे.

  मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी एटीएस ने गुन्हा रजि १२/२०२१ भादंवि ३०२. २०१, १२०ब आणि ३४ अन्वये गुन्हा फिर्यादी विमल मनसुख हिरेन यांच्या तक्रारीवरून दाखल केला आहे. सचिन वझे यांच्या वतीने ठाणे सेशन न्यायालयात न्यायमूर्ती शैलेंद्र तांबे यांच्या दालनात सुनावणीत के.एम. कालेकर यांनी युक्तीवाद केला. त्यांनी सांगितले. अर्जदार सचिन वाझे यांची वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून चौकशी करीत आहेत.

  घटनेच्या वेळी अर्जदार हे डोंगरी परिसरात होते. त्यामुळे हत्या करण्याचा प्रश्नच नाही. दरम्यान विकलं कालेकर यांनी न्यायालयाला २००४ च्या घटनेबाबतही सांगितले. या प्रकरणातही सचिन वाझे यांना गोवण्यात आले होते. त्यावेळीही ५८ दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर त्यांना जमीन देण्यात आला होता. तसेच गुन्ह्यात एटीएस पथकाने अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  कुठलाही आरोप नाही. त्यामुळे अटकपूर्व जामीन मिळण्या हरकत नाही. तर न्यायालयात सरकारी वकील विवेक कडू यांनी युक्तिवादात सांगितले, सचिन वाझे आणि मनसुख हिरेन हे एक दुसऱ्याशी परिचित होते. मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्कॉर्पिओ कार ही सचिन वाझे यांनी वापरलेली होती. आता या प्रकरणाचा तपस एटीएस करीत आहेत.

  अटक पूर्व जामिनावर ठाणे सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती शैलेंद्र तांबे यांनी सचिन वाझे आणि सरकारी वकिलांचा युक्तीवाद एकाला आणि आपल्या निर्णयात म्हटले, २७ आणि २८ फेब्रुवारीला अर्जदार वाझे यांच्या सोबत मृतक मनसुख हिरेन होते. त्यांच्या चौकशीनंतर मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडतो. त्यानंतर अज्ञात व्यक्तीच्या नावावर गुन्हा दाखल होता. मात्र त्यात मृतकाची पत्नी विमल यांना या प्रकरणाची माहिती आहे.

  वाझे आणि मृतक मनसुख हे सातत्याने संपर्कात होते. तसेच मृतकाच्या पत्नीने वाझे यांच्या नावासह आरोप केल्याने आणि त्याची एफआयआर मध्ये नोंदही करण्यात आली. दरम्यान या प्रकरणाचा तपस हा एटीएस पथक करीत असून गुन्हा हा गंभीर आहे. त्यामुळे न्यायालय अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

  तपासात प्राथमिक पुरावे हे वाझे यांच्या विरोधात असल्याने त्यांना अटकपूर्व जमीन नाकारण्यात येत असलयाचे न्यायमूर्ती तांबे यांनी अर्ज फेटाळताना स्पष्ट केले. आणि असेही सांगितले की एटीएस यांनी अर्जदार आरोपी यांना कस्टडीत घेऊन तपास करणे आवशयक आहे. म्हणूनच अटकपूर्व जमीन फेटाळण्यात येत असल्याचा निकाल दिला. दरम्यान याच प्रकरणात पुन्हा १९ मार्च रोजी सुनावणी घेण्यात येणार असलायची माहिती विशेष सरकारी वकील कडू यांनी सांगितले.