भिवंडीत मशिदीत कोरोना रुग्णालयाचे रुपांतर

भिवंडी : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भिवंडीतील मुस्लिम बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपत मशिदीचे रुपांतर रुग्णालयात केलंय. या रुग्णालयात सर्व जाती-धर्मांच्या रुग्णालयांची सेवा केली जात

भिवंडी : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भिवंडीतील  मुस्लिम बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपत मशिदीचे रुपांतर रुग्णालयात केलंय. या रुग्णालयात सर्व जाती-धर्मांच्या रुग्णालयांची सेवा केली जात आहे

शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्यामुळे या परिसरातील खासगी डॉक्टर्सनी देखील आपली प्रॅक्टिस बंद केलेली आहे. त्यामुळे कोविड रुग्णांपासून सामान्य रुग्णांवर उपचार होण्यास विलंब लागत आहे. त्यामुळे शहरातील एका मशिदीचे रुपांतर कोविड रुग्णांसाठी निःशुल्क ऑक्सीजन पुरवठा केंद्रात करण्यात आले आहे. या ठिकाणी सहा डॉक्टरांची टीम आणि वीस तरुणांची टीम दिवस-रात्र या ऑक्सिजन सेंटरवर सेवा देत आहे.
 
भिवंडीत गेल्या तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. कोरोनाचा धसका घेऊन अनेक परप्रांतीय मजुरांनी भिवंडी सोडून आपलं राज्य गाठलेलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव भिवंडी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे या परिसरातील खाजगी डॉक्टरानी देखील आपली प्रॅक्टिस बंद केलेली आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत देखील भिवंडीतील मुस्लीम बांधवांनी त्यांच्या एका मशिदीमध्ये कोरोना रुग्णांसाठी ऑक्सीजन सेंटर तयार करून एक सामाजिक आपुलकी जपलेली आहे. स्थानिक जमात ए इस्लामी हिंद (JIH), मुव्हमेंट फॉर पिस अॅड जस्टिस या मशिदीच्या ट्रस्टच्या वतीने ही सेवा सुरू करण्यात आली आहे. श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या रुग्णांसाठी ऑक्सीजन सिलिंडर आणि पाच खाटांची सोय केली आहे. याशिवाय जमात ए इस्लामी हिंदचे कार्यकर्ते घरपोच ऑक्सीजन सिलिंडरची सेवाही विनामूल्य उपलब्ध करून देत आहेत.