कोरोना रुग्णांची सेवा करणारा कोरो रोबो खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून महापालिकेकडे सुपूर्द

कल्याण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्‍टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी डोंबिवलीतील प्रतीक तिरोडकर या तरुणाने रोबोट तयार केला आहे. आज हा रोबो खासदार श्रीकांत शिंदे यांच्या

 कल्याण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्‍टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी डोंबिवलीतील  प्रतीक तिरोडकर या तरुणाने रोबोट तयार केला आहे. आज हा रोबो खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महापौर विनिता राणे यांच्यासह पालिका अधिकाऱ्यांना रोबो चे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी खासदार शिंदे यांनी या कठीण काळात प्रतीक याने रोबो बनवून आरोग्य विभागात काम करणाऱ्या डॉकटर, वार्ड बॉय, नर्सेस सह रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे.

डोंबिवलीकर तरुण प्रतीक तिरोडकर याने बनवलेला हा कोरो- रोबो इंटरनेटच्या माध्यमातून वायरलेस नियंत्रित केला जाऊ शकतो. या रोबोद्वारे कोरोना रुग्णांना अन्नाची पाकिटे व औषधे पोचविण्यासाठी आणि सुरक्षित अंतर राखण्यासाठी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांकडून अशा रोबोचा वापर केला जाऊ शकतो. रोबोटमध्ये एक डिस्प्ले स्क्रीन, कॅमेरा आणि एक स्पीकरदेखील सुसज्ज करण्यात आला आहे. तसेच या रोबोमध्ये सॅनिटायझरची  व्यवस्था देखील करण्यात आली आहे. चार तासांच्या चार्जिंगनंतर हा रोबो सहा ते आठ तास चालू शकतो. हा रोबो इंटरनेटच्या माध्यमातून ऑपरेट केला जात असल्याने या रोबो ला अंतराचे बंधन नाही. एकूणच हा रोबो आजपासुन पालिकेच्या सेवेत दाखल झाला असून उद्यापासून कोरोना रुग्णाची सेवा करणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.