कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना मृतांनी ओलांडला २२०० चा आकडा, दिवसभरात १३३ नव्या रुग्णांची नोंद

दिवसभरात कल्याण डोंबिवलीमध्ये(Corona Patients In Kalyan Dombivali) १३३ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत ४८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

    कल्याण : कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivali) महानगरपालिका क्षेत्रात कोरोना मृतांच्या(Corona Death) संख्येने २२०० चा आकडा ओलांडला आहे. आज दिवसभरात कल्याण डोंबिवलीमध्ये(Corona Patients In Kalyan Dombivali) १३३ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत ४८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज ३ मृत्यू झाले आहेत.

    आजच्या या १३३ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३४ हजार ७७८ झाली आहे. यामध्ये १५१४ रुग्ण उपचार घेत असून १ लाख ३१ हजार ०६२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २२०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १३३ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-११, कल्याण प -३९, डोंबिवली पूर्व- ४४, डोंबिवली प – २२, मांडा टिटवाळा – १३, तर मोहना येथील ४ रुग्णांचा समावेश आहे.