kalyan building

कोरोना (corona)पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेकडून(kalyan dombivali municipal corporation loss) विकासकांना(builders and developers problem) देण्यात येणाऱ्या परवानग्यांतुन फी पोटी मिळणाऱ्या उत्पन्नात गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्याने घट झाली आहे. कोरोना संकटाचा फटका मनपाच्या उत्पन्न स्त्रोतावर होत आहे .

दत्ता बाठे, कल्याण : कोरोना (corona)पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिकेकडून(kalyan dombivali municipal corporation loss) विकासकांना(builders and developers problem) देण्यात येणाऱ्या परवानग्यांतुन फी पोटी मिळणाऱ्या उत्पन्नात गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्याने घट झाली आहे. कोरोना संकटाचा फटका मनपाच्या उत्पन्न स्त्रोतावर होत आहे .

कल्याण डोंबिवली मनपा क्षेत्रात वाढती लोकसंख्या , वाढते शहरीकरण पाहता विकासकांच्या माध्यमातून अनेक बिल्डिंग, गृहप्रकल्प उभे राहत असुन विकासकांना बिल्डिंग उभारताना कल्याण डोंबिवली पालिकेतून देण्यात येणाऱ्या परवानग्यांच्या फी पोटी कोट्यवधी रूपये मनपा तिजेरीत जमा होतात . मनपाचा उत्पन स्त्रोत असलेल्या विकासकांना देण्यात येणाऱ्या परवानगीसाठी मनपाने ऑटो डी सी आर प्रणाली सुरू करीत एक खिडकी योजना सुरू केली.

यात १ एप्रिल २०२०ते ३०सप्टेंबर २०२०या कालावधीत मनपा क्षेत्रातील कल्याण ०९, डोंबिवली ०४, २७गावे०४, अशा एकुण १७ प्रारंभ परवानग्या, तसेच कल्याण २७, डोंबिवली १४, २७ गावे०५, अशा एकूण ४६ सुधारित परवानग्या, तर कल्याण २३, डोंबिवली १९, २७गावे ०३ , एकुण ४५ वापर परवानग्या विकासकांना देण्यात आल्या. मागील वर्षी १एप्रिल २०१९ ते ८ ऑक्टोबर २०१९ पर्यंत नगररचना विभागामार्फत विकासकांना देण्यात आलेल्या परवानग्यांतून तब्बल ७९ कोटी ५२ लाख ३५ हजार ६७५ रू फी पोटी मनपा फंडात आल्याने तिजोरीत भर पडली होती. यंदा १एप्रिल २०२०ते ८आँक्टोबर २०२० पर्यंत विकासकांना देण्यात आलेल्या परवानग्यातुन फी पोटी ३६ कोटी, २०लाख ३९हजार २४४रू.मनपा तिजोरीत जमा झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत यावर्षात ४३,कोटी ३१लाख ,९६ हजार ४३१रू घट अपेक्षित उत्पन्नात दिसत असल्याने कोरोना पार्श्वभूमीचा चटका मनपा अपेक्षित उत्पन्न स्त्रोतवर होत असल्याचे दिसत आहे.

पालिका नगररचनाकार मारूती  राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार ऑटो डी सी आर प्रणाली अंतर्गत विकासकांना परवानगी बाबत एक खिडकी योजनेतून जलदगतीने निपटरा करीत परवानगी प्रक्रिया केली जाते. विकासकांनी परवानगी फी लवकरात लवकर भरीत प्रशासनाला सहकार्य करावे. काही विकासक घरे घेण्यासाठी रजिस्ट्रेशन फी , बुकिंग फी मध्ये सवलत देत घरे विकत घेण्यासाठी ग्राहकवर्गासाठी जाहिरात करीत आहेत. मात्र काही आतिश्रीमंत , ग्राहकवर्गाचा अपवाद वगळता , कोरोना संकट काळात लॉकडाऊनमुळे येत्या दोन चार वर्षाचे शिल्लकी गणिताचे बजेट कोलमडल्याने इच्छा असुनदेखील माध्यवर्गीय ग्राहक घरे घेण्यासाठी पाठ फिरवत असल्याचे चित्र कोरोना पार्श्वभूमीवर दिसत आहे.

क्रेडाई एम् सी एच आय अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, २७ गावातील विकासकांचा प्रश्न प्रलंबित होता कल्याण काऊन्सिल फर्म झालेली आहे. प्लनिंग ऑथोरिटी कोण असावी याबाबत निर्णय झालेला नव्हता. मंजुरी झाल्या होत्या. मनपाने भरणा करून घ्यावयाचे होते. त्याबाबत पारदर्शकता नव्हती. त्याबाबत एक परिपत्रक शासनाने काढले आहे. त्यामुळे आता विकासक पैसे भरणा करीत आहेत. कोव्हिड धर्तीवर शासनाने एक धोरण आवलंबिलेले आहे. यानुसार क्रेडाई एम सी एच आय निवेदन देत विकासकांना फी भरण्याबाबत सुलभ हफ्त्यात सवलत द्यावी याबाबत स्थायी समितीने मंजुरी दिली असुन दोन वर्षाच्या कालावधीत विकासकांना तीन टप्प्यात डेव्हलपमेंट चार्जेस आदी भरणेबाबत सवलत मिळणार आहे. तसेच घरे घेणाऱ्या ग्राहकासाठी १५ दिवसानंतर ऑनलाईन एक्झीबिशन भरविण्याचा मानस आहे.

x