dombivali navratra

डोंबिवली : सर्वत्र कोरोना महामारीच्या सावटात नागरिक कुटुंबासमवेत दिवस ढकलत असतानाही नवरात्रोत्सव उत्सव मंडळांनी पारंपरिक प्रथेप्रमाणे(corona effect on navratri) अगदी साधेपणाने दुर्गादेवीची प्रतिष्ठापना केली.

डोंबिवली : सर्वत्र कोरोना महामारीच्या सावटात नागरिक कुटुंबासमवेत दिवस ढकलत असतानाही नवरात्रोत्सव उत्सव मंडळांनी पारंपरिक प्रथेप्रमाणे(corona effect on navratri) अगदी साधेपणाने दुर्गादेवीची प्रतिष्ठापना केली. डोंबिवली पूर्व-पश्चिम तसेच ग्रामीण विभागात दुर्गादेवींचे पूजन करून सर्व नागरिकांना कोरोना महामारीतून मुक्ती मिळू दे असे साकडे देवीला घालण्यात आल्याचे मंडळ पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली(dombivali) शहर ग्रामीण मिळून सुमारे ६० ठिकाणी दुर्गादेवींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

गेली अनेक वर्षे पूर्वेकडील महापालिकेच्या ह.भ.प. सावळाराम महाराज मैदानात भारतीय जनता पार्टीतर्फे आमदार रवींद्र चव्हाण आणि डी.एन.सी. मैदानात शिवसेना माध्यमातून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून दुर्गादेवीची स्थापना आणि रास गरब्याचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोराना संक्रमण लक्षात घेऊन भाजपातर्फे सावरकर रोड येथे प्रतिवार्षिक देवकार्यात खंड पडू नये म्हणून घटस्थापना करण्यात आली आहे. तर डी.एन.सी. मैदानात शिवसेना माध्यमातून देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि गोग्रासवाडी प्रतिष्ठान माध्यमातूनही उत्सव साजरा करण्यात आला आहे.

आदिशक्ती युवा उत्सव मंडळ गोग्रासवाडी, श्रीधर म्हात्रे मित्र मंडळ आणि महिला आघाडी, आशीर्वाद मित्रमंडळ तेलकोसवाडी, एकता मित्र मंडळ जुनी डोंबिवली आदी मंडळानी पारंपारिक पद्धतीने नवरात्रोत्सव आयोजित केला आहे. साध्या छोट्या मंडपात दुर्गादेवीची स्थापना करण्यात आली असून सर्व कोविड-१९ नियमांचे पालन करण्यात आले आहेत. धार्मिक कार्य म्हणून पारंपारिक पद्धतीने फक्त देवीची पूजा-आरती करण्यात येणार आहे. कोणत्याही महिलेस देवीची ओटी भरणे, गर्दी करण्यास परवानगी दिली जाणार नाही, अशी चोख व्यवस्था करण्यात आल्यामुळे कोरोना संक्रमण होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. ग्रामीण विभागातही नवयुवक मित्र मंडळ नांदिवली तसेच विविध मंडळांतर्फे नवरात्रोत्सव उत्सव आयोजित करण्यात आला आहे.