भिवंडीत एकाच दिवसात ११७ नवे रुग्ण , २ जणांचा मृत्यू

भिवंडी: भिवंडीत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी शहरात एकाच दिवसात कोरोनाचे ८१ नवे रुग्ण आढळले असून २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ग्रामीण भागात ३६ नवे रुग्ण आढळले आहेत. आज शहर

 भिवंडी: भिवंडीत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी शहरात एकाच दिवसात कोरोनाचे ८१ नवे रुग्ण आढळले असून २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ग्रामीण भागात ३६ नवे रुग्ण आढळले आहेत. आज शहर व ग्रामीण भागात एकूण ११७ नवे रुग्ण आढळले आहेत. भिवंडी शहरात आतापर्यंत ८७५ रुग्ण आढळले असून त्यापैकी ४४९ रुग्ण बरे झाले आहेत तर ६६ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून ३६१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ग्रामीण भागात आतापर्यंत ३८७ रुग्ण आढळले असून त्यापैकी १४७ रुग्ण बरे झाले आहेत तर ८ रुग्णांचा मृत्यू झाला असून २३२ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान शनिवारी आढळलेल्या ११७ नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील शहर व ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा १२६२ वर पोहचला असून त्यापैकी ५९५ रुग्ण बरे झाले आहेत तर ७४ रुग्णांचा मृत्यू झाला असून ५९३ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.