ठाणे महानगरपालिका स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण, कशेळी गावचा रहिवासी असल्याने परिसर सील

भिवंडी : महाराष्ट्रात विविध ठिकाणी पसरणारा कोरोना विषाणू हळूहळू भिवंडी तालुक्यात ही हातपाय पसरू लागला आहे. पडघा बोरिवली पाठोपाठ ठाणे कशेळी येथे राहणारी ५७ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळून

 भिवंडी : महाराष्ट्रात विविध ठिकाणी पसरणारा कोरोना विषाणू हळूहळू भिवंडी तालुक्यात ही हातपाय पसरू लागला आहे. पडघा बोरिवली पाठोपाठ ठाणे कशेळी येथे राहणारी ५७ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नळदकर यांनी दिली आहे. ही व्यक्ती ठाणे महानगरपालिका स्वच्छता विभागात मुकादम म्हणून काम करणारी असून रुग्णास ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या कुटुंबातील ४ व्यक्तींना टाटा आमंत्रण येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये हलविण्यात आले असल्याची माहिती डॉ मोहन नळदकर यांनी दिली .

कशेळी ग्रामपंचायतीच्या ज्या भागात रुग्ण वास्तव्यास होता त्या ठिकाणी खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ डावखर व त्यांच्या आरोग्य पथकाने स्थानिक नारपोली पोलिसांच्या मदतीने रुग्णाच्या इमारती लगतचा परिसर सील करीत नागरीकांची आरोग्य तपासणी सुरू केल्याची माहिती गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे यांनी दिली आहे . भिवंडी शहर व ग्रामीण भाग मागील काही दिवसांपासून कोरोनापासून सुरक्षित असताना भिवंडी शहरात ३ तर ग्रामीण मध्ये २ असे एकूण ५ रुग्ण तालुक्यात आढळून आल्याने तालुक्यातील प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी नागरीकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत सोशल 
डिस्टन्सिंग पाळावे व अनावश्यक घराबाहेर पडू नये, असे आवाहन भिवंडीचे उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नळदकर यांनी केले आहे .