ठाण्यात रुग्णवाढीला लागला थोडा ब्रेक,मृतांचा आकडाही स्थिरावला

ठाणे पालिका क्षेत्रात पालिका प्रशासनाच्या प्रयत्नांना यश लाभले आहे. ठाण्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येला(corona patients in thane) ब्रेक लागला आहे. मागच्या पाच दिवसात सर्वाधिक रुग्ण सापडण्याचा आकडा हा १५४ आहे. मृतांचा आकडा ३ वर स्थिरावला आहे. 

ठाणे : ठाणे पालिका क्षेत्रात पालिका प्रशासनाच्या प्रयत्नांना यश लाभले आहे. ठाण्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येला(corona patients in thane) ब्रेक लागला आहे. मागच्या पाच दिवसात सर्वाधिक रुग्ण सापडण्याचा आकडा हा १५४ आहे. मृतांचा आकडा ३ वर स्थिरावला आहे.

ठाण्यात रोज रुग्ण सापडण्याची ५०० वर गेलेली  संख्या डिसेंबर महिन्यात चांगलीच घसरली आहे. नोव्हेंबर महिन्यात २०० च्या आसपास सापडणारे रुग्ण आता शंभरीच्या आसपास आलेले आहेत. मागील पाच दिवसाच्या सापडणाऱ्या रुग्णांची संख्या १२५ च्या आसपास स्थिरावलेली आहे. तर या पाच दिवसात सर्वाधिक रुग्ण सापडण्याचा आकडा हा १५४ एवढा आहे.

ठाण्यात ५ डिसेंबर रोजी रुग्णांची संख्या ही १५४ होती. ६ डिसेंबरला रुग्ण संख्या १२९, ७ डिसेंबर रोजी १०५, ८ डिसेंबर रोजी ११९ तर बुधवारी रुग्णसंख्या १२७ एवढी आहे. तर मृतकांचा एकदा या पाच दिवसात ३ वर स्थिरावला आहे. पाच दिवसात ७ डिसेंबर रोजी मात्र मृतकांचा आकडा २ वर आलेला होता. ठाणे पालिका प्रशासनाच्या वाढविलेल्या चाचण्या, कोरोनाबाधित आणि संशयितांची आकडेवारी ही सव्वाशेच्या आतबाहेर स्थिरावलेली आहे. ठाणे पालिका डिसेंबर महिन्यात येणाऱ्या  दुसऱ्या कोरोना लाटेच्या तयारीत असतानाच कोरोनाचा पराभव ठाणेकरांनी सुरक्षेच्या उपाययोजनेमुळे होत असल्याचे चित्र आहे.