#Coronaकल्याण डोंबिवलीत कोरोना रूग्णांनी ओलांडला १५ हजारांचा टप्पा

-४०७ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू

-१५००५ एकूण रुग्ण तर २३१ जणांचा आतापर्यंत मृत्यू

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका(KDMC)क्षेत्रातील कोरोना रूग्णांच्या संख्येने १५ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आज ४०७ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ६ जणांचा मृत्यू झाला असून ४३७ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे.  आजच्या या ४०७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १५००५  झाली असून यामध्ये ६१७२ रुग्ण उपचार घेत असून ८६०२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २३१    जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ४०७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व -९०, कल्याण प.-१०३, डोंबिवली पूर्व -११९, डोंबिवली प-५७, मांडा टिटवाळा-११, मोहना –२१ तर पिसवली येथील ६ रुग्णांचा समावेश आहे.