Corona Virus Image

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका|(kalyan dombivali municipal corporation) क्षेत्रात कोरोना रुग्णांची(corona patients) संख्या ३६ हजार पार गेली असून आज नव्या ३९६ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ४६७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजच्या या ३९६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३६,१३१ झाली आहे. यामध्ये ५२०१ रुग्ण उपचार घेत असून ३०,१९१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ७३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ३९६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व – ५६, कल्याण प.- १२६, डोंबिवली पूर्व ११०, डोंबिवली प.- ५९, मांडा टिटवाळा – ३७, मोहना -५, तर पिसवली येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १६७ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून १४ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ८ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, २ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, ८ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, ४ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.