कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णांनी ओलांडला ६७ हजारांचा टप्पा, २३६ नव्या रुग्णांची नोंद

कल्याण डोंबिवली(kalyan dombivali) महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी(corona patients in kalyan dombivali)६७ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज २३६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली.

    कल्याण: कल्याण डोंबिवली(kalyan dombivali) महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांनी(corona patients in kalyan dombivali)६७ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज २३६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. गेल्या २४ तासांत २०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोरोनामुळे आज तीन मृत्यू झाले आहेत.

    आजच्या या २३६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६७,१६२ झाली आहे. यामध्ये ३०६८ रुग्ण उपचार घेत असून ६२,९०८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११८६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या २३६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-३७, कल्याण प – ६०, डोंबिवली पूर्व –१०१, डोंबिवली प – २३, मांडा टिटवाळा – ११, तर मोहना येथील ४ रुग्णांचा समावेश आहे.