Corona-virus

ठाणे: ठाण्यात (thane)कोरोनाच्या रुग्णांची(corona patients) एकदम घसरलेल्या नव्या रुग्णांच्या संख्येत मात्र रविवारपासून रुग्णांच्या संख्येत बेरीज होत असल्याचे पालिका प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

ठाणे: ठाण्यात (thane)कोरोनाच्या रुग्णांची(corona patients) एकदम घसरलेल्या नव्या रुग्णांच्या संख्येत मात्र रविवारपासून रुग्णांच्या संख्येत बेरीज होत असल्याचे पालिका प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गुरुवारी रात्री ठाण्यात ३३६ नवे रुग्ण आढळले होते. तर मागच्या गुरुवारी तब्बल ११० पेक्षा अधिक रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे.

ठाण्यात मागील गुरुवारी रुग्णांचा आकडा २१९ एवढा होता. शुक्रवारी रुग्णांची संख्या- २४४ , शनिवारी-२१३, रविवारी -१७० तर सोमवारी-१३० रुग्ण, मंगळवारी-१८९, बुधवारी २१९ आणि आज ठाण्यात ३३६ नवे रुग्ण अढळले आहेत. रविवारपासून सातत्याने रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. तर आज आकडा वाढला आहे. गुरुवारपर्यंत ठाण्यात आतापर्यंत कोरोनमुक्त झालेल्यांची संख्या ४२,९४२ एवढी आहे. तर प्रत्यक्षात ठाण्यात उपचार आजच्या स्थितीला घेणाऱ्या रुग्णांची संख्या २१९८ आहे तर गुरुवारी कोरोनावर मत करून घरी गेलेल्या रुग्णांची संख्या २४५ एवढी आहे. तर गुरुवारी मृत पावलेल्या रुग्णांची संख्या ४ एवढी आहे. तर आतापर्यंत ठाण्यात कोरोनाचे बळी पडलेल्या रुग्णनाचा एकदा ११४५ एवढा आहे.

ठाण्यात रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत असलयाचे दिलासादायक चित्र असतानाच आता रविवार पासून ते गुरुवार पर्यंत कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे ठाण्यातून कोरोना संपुष्टात येण्याच्या मार्गावर असताना अचानक वाढत गेलेल्या रुग्ण संख्येमुळे ठाणेकर हवालदिल झाले आहेत. रुग्णांची संख्या निश्चितच रोधावलेली आहे. मात्र कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही.