ठाण्यात कोरोना रुग्णांना लागलय ब्रेक, रुग्णसंख्येत सातत्याने घसरण, पालिकेची वाटचाल कोरोना मुक्त शहराकडे

शनिवारी ठाण्यात ९९ नवे रुग्ण सापडले तर १३७ रुग्णांना घरी पाठविण्यात आलेले आहे. आता प्रयन्त ५० हजार ७७६ ठाणेकरांना कोरोनाची लागण झालेली होती आणि कोरोनावर मत करून घरी पाठविण्यात आलेले आहे. तर कोरोनाच्या प्रादुर्भावाने आतापर्यंत १२०७ रुग्ण दगावले आहेत.

ठाणे : ठाण्यात ऐन कोरोनाच्या (Corona) काळात ५०० रुग्ण सापडण्याचा विक्रमी आकडा असताना सात्यत्याने कोरोनाच्या रुग्ण संख्येत (Corona patients)  सातत्याने कमी होत चालली असून मागील आठवड्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा हा १५० च्या आसपास होता. मात्र १२ डिसेंबर, रोजी कोरोनाची रुग्णसंख्या हि शंभरीच्या आता आल्याचे चित्र दिसले. शनिवारी ठाण्यात सापडलेल्या रुग्णांची संख्या ९९ एवढी असून पालिका प्रशासन आणि ठाणेकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तर ठाणे पालिका आता कोरोना मुक्त शहराकडे वाटचाल करीत असल्याचे  चित्र आहे.

शनिवारी ठाण्यात ९९ नवे रुग्ण सापडले तर १३७ रुग्णांना घरी पाठविण्यात आलेले आहे. आता प्रयन्त ५० हजार ७७६ ठाणेकरांना कोरोनाची लागण झालेली होती आणि कोरोनावर मत करून घरी पाठविण्यात आलेले आहे. तर कोरोनाच्या प्रादुर्भावाने आतापर्यंत १२०७ रुग्ण दगावले आहेत. तर शनिवारी मृतकांचा आकडा  २ वर आहे. तर शनिवारी पालिकेने ५,६२९ लोकांच्या चाचण्या केलेल्या आहेत. पालिका प्रशासनाने चाचण्यांची संख्या वाढवल्याने रुग्णांची संख्या घटत  जात आहे. तर रुग्ण सापडण्याचे प्रमाणही कमी होत चालले असून तीन अंकावरून रोज सापडणाऱ्या रुग्णांची संख्या आता दोनअंकी झालेली आहे. पालिकेने आता पर्यंत ७लाख २५ हजार ६८३ ठाणेकरांच्या चाचण्या आतापर्यंत केलेल्या आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९५ टक्के एवढी आहे.

मागील पाच दिवसाच्या सापडणाऱ्या रुग्णांची संख्या १२५ च्या आसपास स्थिरावलेली आहे. ठाण्यात ५ डिसेंबर रोजी रुग्णांची संख्या ही १५४ होती. ६ डिसेंबरला रुग्ण संख्या १२९, ७ डिसेंबर रोजी १०५, ८ डिसेंबर रोजी ११९ तर  ९ डिसेंबर रोजी रुग्णसंख्या १२७ एवढी आहे. १० डिसेंबर रोजी रुग्ण संख्या..११८एवढी ११ डिसेंबर रोजी रुग्णसंख्या.१४६ एवढी असून १२ डिसेंबर रोजी रुग्णसंख्या हि ९९ वर येऊन ठेपलेली आहे. ठाण्यात पाच डिसेंबर पासून रुग्ण संख्या घसरत गेलेली आहे. तर मृतकांचा रोजचा आकडा हा ३ एवढा होता. मात्र ७ डिसेंबर आणि १२ डिसेंबर रोजी मृतकांचा एकदा हा २ वर होता.