कोरोना संघर्ष समितीच्या आंदोलनाला कल्याण पुर्वमधून सुरुवात

कल्याण : कल्याण पुर्वेत कोविड १९ संदर्भात आरोग्य सेवेबाबत कोणतीच उपाययोजना महापालिकेमार्फत नाही. फक्त तापाच्या रुग्णालया व्यतिरीक्त काहीही ठोस यंत्रणा पुरवली जात नसल्याने कोविड १९ बाधित,

 कल्याण : कल्याण पुर्वेत कोविड १९ संदर्भात आरोग्य सेवेबाबत कोणतीच उपाययोजना  महापालिकेमार्फत नाही. फक्त तापाच्या रुग्णालया व्यतिरीक्त काहीही ठोस यंत्रणा पुरवली जात नसल्याने कोविड १९ बाधित, कोविड संशयित नागरीकांची अतिशय परवड होत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी कल्याण पूर्वेत कोरोना संघर्ष समितीच्या माध्यमातून नागरिकांनी आंदोलनाला सुरवात केली आहे.

कल्याण पुर्वेत आरोग्य सेवा, हॉस्पिटलला पोहचून सुध्दा बेड,  उपचार न मिळाल्याने दोन रुग्ण दगावले आहेत. वारंवार मागणी करुन कल्याण पुर्वेत कोरंटाईन सेंटर, कोविड १९ उपचारार्थ रुग्णालय, संशयित रूग्णांकरीता खाजगी होस्पिटलमधे आयसोलेशन वार्ड, लहान मुलांसाठी कोविड रुग्णालय, त्वरीत रिपोर्ट मिळण्याकरीता जादाची लॅब, पीसीआर मशीन,  पूर्ण वेळ अॅम्ब्युलन्स आदी सुविधा मिळत नाही. उपचार व टेस्टकरीता द्यावे लागणारे चार्जेस परत मिळावे. खाजगी रुग्णालयात दर्शनी ठिकाणी हॉस्पिटलचे चार्जेस बाबत बोर्ड लावण्यात यावा. याबाबत व इतर  आरोग्य सुविधा देण्यास पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.

येणारा काळ कठीण असणार आहे हे वारंवार पालिकेच्या निदर्शनास आणूनसुध्दा तातडीने पावले उचले जात नाहित. यासाठी कल्याण पुर्वेतील सामजिक कार्यकर्त्यांनी एकत्रीत येवुन नागरिकांसोबत कोरोना संघर्ष समिती कल्याण पुर्व हा प्लाटफॉर्म तयार केला आहे. त्या माध्यमातून आज पासुन ऑनलाइन आंदोलन सुरू झाले आहे. हे आंदोलन लक्षवेधी होइल असे आयोजकांचे म्हणणे असून कल्याण पुर्वेतील नागरीकांनी या आंदोलनात सोशल डिस्टन्सिंग पाळून  सहभागी व्हावे, असे आवाहन उदय रसाळ, विजय मोरे, विनोद तिवारी, शैलेश तिवारी, प्रशांत जाधव,  राहुल काटकर यांनी केले आहे.

कल्याण पुर्वेतील अनेक सामजिक कार्यकर्ते सामजिक संस्था संघटना हे या आंदोलनाकरीता आग्रही भूमिकेत आहेत. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहील. उद्या प्रत्यक्ष सर्व प्रभाग क्षेत्र कार्यलयासमोर फेसबुक लाईव्ह येऊन पालिकेच्या कार्यपद्धतीचा समाचार घेतला जाणार असल्याचे आयोजक उदय रसाळ यांनी सांगितले.