कोरोना सैनिकांची कामाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करा – राष्ट्र कल्याण पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कल्याण : सध्या सुरू असणाऱ्या कोरोना या महामारीच्या काळात संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. तरीही नागरिकांच्या सेवेसाठी आपल्या प्राणाची पर्वा न करता पोलीस, डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, शासकीय

कल्याण : सध्या सुरू असणाऱ्या कोरोना या महामारीच्या काळात संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. तरीही नागरिकांच्या सेवेसाठी आपल्या प्राणाची पर्वा न करता पोलीस, डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, शासकीय कर्मचारी, रुग्णवाहिका आणि अग्निशमन कर्मचारी, अंगणवाडी आशा, सुरक्षा रक्षक, सफाई कामगार, पत्रकार हे सर्व कोरोना सैनिक आपली कर्तव्ये पार पाडत आहेत आणि कोरोनापासुन नागरिकांचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु हे सर्वजण कर्तव्ये बजावत असताना यांचे स्वतः बरोबर त्यांच्या परिवाराचे देखील आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळे या कोरोना सैनिकांची राहण्याची आणि जेवणाची सोय कामाच्या जवळपासच्या ठिकाणी करण्याची मागणी राष्ट्र कल्याण पार्टीचे महासचिव राहुल काटकर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. कोरोनामध्ये सेवा देत असताना अनावधापणाने कित्येक पोलीस, डॉक्टर, परिचारिका, मेडिकल कर्मचारी, शासकीय कर्मचारी, पत्रकार हे कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येऊन यांना देखील कोरोनाची लागण  होत आहे. त्यामुळे त्यांचा परिवारदेखील कोरोनाच्या सावटापासुन सुरक्षित नाही, असेच दिसत आहे. अशा आपत्कालीन परिस्थतीमध्ये या सर्व कोरोना सैनिकांना त्यांचे काम करण्याचे ठिकाण असेलल्या परिसराच्या जवळपास राहण्याची व जेवणाची उत्तम सोय सरकारतर्फे करण्यात यावी. जेणेकरून कमीत कमी त्यांचे परिवार तरी सुरक्षित राहतील. त्यामुळे त्यांच्या मनामधील परिवाराबद्दलची चिंता थोड्याफार प्रमाणात कमी होईल आणि त्यांना काम करताना मनामध्ये दडपणदेखील राहणार नसल्याचे राहुल काटकर यांनी सांगितले.