कल्याणमध्ये एकाच इमारतीमधील ३० जणांना कोरोनाची बाधा, गणेशोत्सवासाठी जमले होते एकत्र

कल्याणमध्ये एका इमारतीत गणपतीसाठी एकत्र आलेल्या परिवारातील ३० जाणांना कोरोनाची लागण झाली आहे. या इमारतीमध्ये ४० परिवार राहतात. हे सर्वजण गणेशोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आले होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना एकत्र येण्यास मनाई असतानाही मोठ्या उत्साहात भाविक एकत्र येत होते. इमारीतीतल पुर्ण परिवार एकत्र आल्याने कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.

कल्याण : राज्यात कोरोनाचा (Corona) संसर्ग वाढला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी गणेशोत्सव हा साधारणपणे साजरा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. परंतु गणेशोत्सवादरम्यान कोरोनाचा संसर्ग वाढल्याच दिसत आहे. कल्याणमध्ये एकाच इमारतीमधील ३० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. (Thirty people have been infected with the corona) त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी राज्य सरकारने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्याचे पालन करण्याच आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले होते. यामध्ये एका ठिकाणी जास्त जणांना जमन्यास मनाई होती. परंतु सर्व नियम धाब्यावर बांधून सर्व नागरिक एकमेकांच्या घरी ये-जा करत होते. कल्याणमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पूर्ण इमारतीतील लोक जमली होती.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील जोशीबाग परिसरात ४ मजली इमारतीमधील परिवारातील सुमारे ४० जण दरवर्षी घरगुती गणपतीसाठी एकत्र येतात. यंदा देखील गणपती आरती व पुजा निमित्ताने एकत्र आलेल्या परिवारातील ३० जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले असुन त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. २७ ऑगस्ट रोजी परिवारातील एकचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या कॉन्टॅक मध्ये आलेल्या परिवारातील गणपती आरती व पुजा निमित्ताने एकत्र येणाऱ्या ३३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये ३० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर तीन जणांचे कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याने कोरोना च्या पार्श्वभूमीवर सोशलडिस्टनच्या नियमांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे. हे चित्र ३० जणांच्या कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट मुळे दिसत आहे.

“केडीएमसी साथरोग अधिकारी डॉ.प्रतिभा पानपाटील यांनी ३०जणांचे कोरोना चाचणी रिपोर्ट पाँझिटिव्ह आल्याचे तसेच ३जणांचे कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे सांगत पाँझिटिव्ह रूग्णावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगितले.”