जूनमध्ये कल्याण डोंबिवलीत कोरोना टेस्टींग लॅब सुरु होणार – मनसेच्या पाठपुराव्याला यश

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोना टेस्टिंग लॅब सुरु करा,अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी २९ मार्च रोजी केली होती आणि त्याचा पाठपुरावा सुद्धा करत होते. आता ती मागणी मान्य झाली असून

 डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोना टेस्टिंग लॅब सुरु करा,अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी २९ मार्च रोजी केली होती आणि त्याचा पाठपुरावा सुद्धा करत होते. आता ती मागणी मान्य झाली असून जूनमध्ये टेस्टिंग लॅब सुरु करण्यात येणार आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण-डोंबिवली मध्ये कोरोना टेस्टिंग लॅब सुरु करा अशी मागणी करत पाठपुरावा केला होता. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांनी जून महिन्यात कोरोना टेस्टिंग लॅब सुरु करणार आहोत, असे पत्रकारांना सांगितले. त्यामुळे मनसे आमदार यांच्या पाठपुराव्याला पुन्हा यश आले आहे.यापूर्वी सुद्धा कोरोना रुग्णांना मोफत उपचार मिळावा यासाठी पत्रव्यवहार आणि पाठपुरावा सर्वात प्रथम मनसे आमदार यांनी केला होता आणि या पाठपुराव्याला यश आले. मनसे आमदारच्या पाठपुराव्याची राज्य सरकारकडून दखल घेतली जात असून सकारात्मक प्रतिसाद दिला जात आहे.त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब,आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांचे आभार मानले आहेत.