
मुंबईत कोरोनाची डेंजर स्थिती असताना ठाण्यातही चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. ठाण्यातील प्रसिद्ध हॉटेलमधील २१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे ठाण्यात कम्युनिटी स्प्रेडचा धोका निर्माण झाला आहे.
ठाणे : मुंबईत कोरोनाची डेंजर स्थिती असताना ठाण्यातही चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. ठाण्यातील प्रसिद्ध हॉटेलमधील २१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे ठाण्यात कम्युनिटी स्प्रेडचा धोका निर्माण झाला आहे.
ठाणे-घोडबंदर रोडवरील एक्सप्रेस इन हे प्रसिद्ध हॉटेल आहे. या हॉटेलमधील २१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांची १८ फेब्रुवारी रोजी कोरोना चाचणी करण्यात आली. या कोरोना चाचणीचा पॉझिटीव्ह आल्यानंतर हॉटेल मालकासह कर्मचाऱ्यांची दाणादाण उडाली.
मीरा-भाईंदर पालिकेकडून हे हॉटेल सील करण्यात आले आहे. कोरोना चाचणीचा पॉझिटीव्ह आलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.