गेल्या ५ महिन्यांमध्ये महापालिकेची मास्क न वापरणाऱ्यांकडून ५ लाखांची दंड वसूली

दत्ता बाठे, कल्याण : कल्याण डोंंबिवली(kalyan dombivali) मनपाने कोरोना(corona) पार्श्वभूमीवर एप्रिल ते ऑगस्ट अखेरपर्यंत मास्क (mask)न घालता सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उचलीत सुमारे ५लाख रु. दंड(fine) वसूल केला आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गला आळा बसण्यासाठी काही नियमाचे पालन करणे निकडीचे असुन देखील मनपा क्षेत्रातील काही नागरिक सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क न वापरताना फिरताना आढळले असल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलीत प्रत्येकी ५००रू दंड वसूल केला गेला आहे.

प्रशासकीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनपाने जुन ते ऑगस्ट दरम्यान केलेल्या प्रभागनिहाय प्रभागानुसार कारवाई त १/”अ ” प्रभागात २३२ नागरिकांकडुन १,१६,०००रू. दंड वसुल केला. तर २/”ब”प्रभागातील कारवाईत २५७नागरिकांकडुन १,२८,५०० रू. दंड वसुल केला. ३ /”क’’ १०६प्रभागातील नागरीकाकडुन ५५,०००रू दंड वसुल केला. ४ /”जे ” प्रभागात ४४नागरिकांकडुन २१,७५० रू दंड वसुल केला.
५/ “ड ” प्रभागातील १५४नागरिकाकडुन ७७,०००रू दंड वसुल केला ६/”फ ” प्रभागातील नागरिकांकडुन ७/”ह” प्रभागातील नागरिकांकडुन १३,००० दंड वसुल केला. ८/”ग” प्रभागातील नागरिकांकडून १२,४०० दंड वसुल केला “९/”आय्” प्रभागातील ६०नागरिकांंकडून १९,९०० दंड वसुल केला ,१० /”ई” प्रभागातील नागरिकांकडुन ४३,५०० दंड वसूल केला.

सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसुली मोहीम सुरू आहे. कल्याण डोंबिवली महापालिका आतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसुल करण्याची मोहीम सुरु असुन कोरोना पार्श्वभूमीवर नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करीत सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर केला पाहिजे. तसेच जे दुकानदार आपल्या दुकानामध्ये आलेल्या ग्राहकांच्या बाबतीत सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करीत नसल्याचे आढळल्यास त्या दुकानदारावर देखील कारवाई करण्यात येणार असुन नागरिकांनी सोशल डिस्टन नियमांचे पालन करीत सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले आहे.