मनपाचे आधार कार्ड सुविधा केंंद्र जेष्ठ नागरिकांसाठी बनलंय असुविधा केंंद्र

जेष्ठ नागरिक, दिव्यांग यांच्या सुविधेसाठी दुसऱ्या मजल्यावरील आधार कार्ड केंंन्द्र हे तळमजल्यावर हलविण्यात यावे अशी मागणी कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदनाद्वारे मनसे शहर संघटक रूपेश भोईर यांनी केली आहे.

    कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाच्या “क” प्रभाग क्षेत्र कार्यालय येथे सुरु असलेले आधार कार्ड सुविधा केंंन्द्र हे दिव्यांग, जेष्ठ नागरिकांसाठी बनलंय असुविधा केंंद्र या आधार कार्ड केंंद्रात येणाऱ्या जेष्ठ नागरिक, दिव्यांगाना दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

    कल्याण पश्चिमेतील कै. चंद्रकांत भोईर सभागृह ” क” प्रभागक्षेत्र कार्यालय येथे सामान्य नागरिकांना आधार कार्ड काढण्यासाठी, आधार कार्ड मधील दुरूस्ती संदर्भात आधार कार्ड केंंद्र दुसऱ्या मजल्यावर सुरू असुन आधार कार्डच्या कामानिमित्त येणाऱ्या जेष्ठ नागरिक, दिव्यांग यांंना द्रविडी प्रणायम करीत दुसऱ्या मजल्यावर जाताना पहिला मजल्याचा जिना दुसरा मजला या मधील जोडणारे भागात कठडे तसेच लोखंडी रोलिंग नसल्याने तसेच आधारासाठी दोरीचा देखील साहरा नसल्याने असुविधा होत जावे लागत आहे.