कल्याणमध्ये अनधिकृत बांधकामावर मनपाचा हातोडा

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC)  'अ' क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ११ मधील बल्याणी परिसरात अनधिकृतपणे तयार झालेल्या १० खोल्याचे अनधिकृत बांधकाम तसेच ८ जोत्याचे अनधिकृत बांधकाम अतिक्रमण नियंत्रण पथकाने शुक्रवारी जमीनदोस्त केले.

 कल्याण: “अ”प्रभागातील बल्याणी टेकडी परिसरातील १० अनधिकृत खोल्यांचे बांधकाम (construction ) तसेच ८ जोत्याचे अनधिकृत बांधकामावर शुक्रवारी प्रभागक्षेत्र अधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने कारवाईचा बडगा उचलित अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले (Corporation’s hammer on unauthorized construction in Kalyan)  कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC)  ‘अ’ क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ११ मधील बल्याणी परिसरात अनधिकृतपणे तयार झालेल्या १० खोल्याचे अनधिकृत बांधकाम तसेच ८ जोत्याचे अनधिकृत बांधकाम अतिक्रमण नियंत्रण पथकाने शुक्रवारी जमीनदोस्त केले.

प्रभाग क्रमांक ११ येथील बल्याणी टेकडी परिसरात १० खोल्याचे अनधिकृत बांधकाम तसेच ८ जोत्याचे अनधिकृत बांधकाम झाल्याचे प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकल यांच्या निदर्शनास आल्याने या बांधकामावर त्यांनी तात्काळ हातोडा चालून पूर्णत्वास आलेले अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. तसेच अटाळी परिसरातील रिंगरूट मधे बाधित असणारी श्री गणराज हाईट श्री कृष्ण बिल्डर यांची कंपाऊंड वाल निष्कासित करण्यात आली. मोहने येथे एका अनाधिकृत हातगाडीवर तोडक कारवाई करण्यात आली.

या कारवाईसाठी दोन जेे.सी. बी. अनधिकृत बांधकाम विभागचे आठ पोलीस कर्मचारी तसेच अनधिकृत बांधकाम पथकाचे १० कर्मचारी “अ” प्रभागक्षेत्र अधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने केलेल्या अनधिकृत बांधकामावरील कारवाईमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांचा या कारईने धाबे दणाणले आहेत.