नगरसेविकेची भन्नाट आयडिया ; आता कुणीही कचरा इकडे-तिकडे फेकणार नाही

ओला-सुका कचरा वेगळा करून पालिकेच्या घंटागाडीत टाकावे आणि सोसायट्यांनी कचरापेटीत कचरा जमा करून घंटागाडीत टाकावे असे आवाहन नगरसेविका मनीषा धात्रक (Corporator Manisha Dhatrak) यांनी केले.

कल्याण : शून्य कचरा मोहिमे अंतर्गत कचरामुक्तीकडे वाटचाल होण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) हद्दीत सर्व प्रभाग कचराकुंडी मुक्त करण्यासाठी आणि ओला-सुका कचरा वर्गीकरणावर भर दिला आहे. यासाठी लोकप्रतिनिधीचीही पालिका प्रशासनाला मदत मिळत आहे. डोंबिवलीतील प्रभाग क्र.६० गणेश मंदिर एलोरा सोसायटी येथे अनेक सोसायट्यांना कचरा जमा करण्यासाठी कचरापेटी आणि रहिवाश्यांना डसबिन देण्यात आले.

ओला-सुका कचरा वेगळा करून पालिकेच्या घंटागाडीत टाकावे आणि सोसायट्यांनी कचरापेटीत कचरा जमा करून घंटागाडीत टाकावे असे आवाहन नगरसेविका मनीषा धात्रक (Corporator Manisha Dhatrak) यांनी केले. फेरीवाला मुक्त प्रभाग करण्यासाठी नगरसेवक शैलेश धात्रक आणि नगरसेविका मनीषा धात्रक यांना यश आले आहे.

त्यामुळे हे दोन्ही प्रभाग कचराकुंडी मुक्त आणि स्वच्छ व सुंदर प्रभाग करण्यास नक्की यश मिळेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. तर डोंबिवलीतील हे दोन्ही प्रभाग इतर पालिकेसाठी एक मॉडेल ठरेल असे प्रभागातील नागरिकांनी सांगितले.