corona vaccine in thane district

कोरोनावर गुणकारी(corona vaccine) ‘कोविशील्ड’ या लसीचा(kovisheild vaccine) पहिला साठा आज पहाटे ४.३० वाजता ठाणे जिल्ह्यात(thane district)  दाखल झाला आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार १६ जानेवारी २०२१ रोजी लसीकरणास प्रारंभ होणार आहे.

ठाणे : कोरोनावर गुणकारी(corona vaccine) ‘कोविशील्ड’ या लसीचा(kovisheild vaccine) पहिला साठा आज पहाटे ४.३० वाजता ठाणे जिल्ह्यात(thane district)  दाखल झाला आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार १६ जानेवारी २०२१ रोजी लसीकरणास प्रारंभ होणार आहे. विशेष वाहनाने ही लस ठाणे येथे  आणण्यात आली आहे. उपसंचालक कार्यालय मुंबई मंडळ ठाणे येथे हा साठा पोहोचविण्यात आला आहे.

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडून ठाणे मंडळासाठी सुमारे १ लाख ३ हजार डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. यापैकी ठाणे जिल्ह्यासाठी ७४ हजार डोस उपलब्ध झाले आहेत. या ठिकाणाहून ठाणे जिल्ह्यातील २९ निर्देशित लसीकरण केंद्रांमध्ये ही लस पोहोचवण्यात येईल. उपसंचालक डॉ गौरी राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिष रेंघे हे लसीकरण मोहिमेचे पुढील नियोजन करीत आहेत.