क्रेडाई  एम् . सी. एच्. आय्. व भारतीय जैन संघटना माध्यमातून नागरिकांच्या सेवेसाठी ” डॉक्टर आपल्या दारी” उपक्रम सुरु

कल्याण :- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरु असुन नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातुन क्रेडाई एम.सी.एच.आय कल्याण-डोंबिवली युनिट व क्रेडाई एम.सी.एच.आय यांनी कल्याण डोंबिवली

कल्याण :-  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरु असुन नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातुन क्रेडाई एम.सी.एच.आय कल्याण-डोंबिवली युनिट व क्रेडाई एम.सी.एच.आय यांनी कल्याण डोंबिवली येथील नागरिकांच्या सेवेसाठी “डॉक्टर आपल्या दारी ” या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत मोबाईल डिस्पेन्सरी सेवा सुरू केली असून नागरी आरोग्याच्या प्रश्नाबाबत क्रेडाई  एम् . सी. एच्. आय्. कल्याण डोंबिवली युनिट, भारतीय जैन संघटना नागरिकांच्या मदतीला धावली असुन हा उपक्रम महिनाभर चालू असणार आहे. 

महापौर सौ.विनिताताई राणे व जेष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे यांच्या हस्ते डोंबिवली येथील शास्त्री नगर रुग्णालयातून या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यासाठी क.डों.म.पा.आयुक्त श्री.विजय सुर्यवंशी आणि समस्त डॉक्टर,नर्स व स्वयंसेवक यांचे मौलाचे सहकार्य लाभले.तसेच हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात युनिचे अध्यक्ष श्री.दिपक मेहता,सचिव श्री.मिलिंद चव्हाण,माजी अध्यक्ष प्रफुल्ल शाह, माजी नगरसेवक रवि पाटील, राजन बालसराफ व सर्व युनिटचे पदाधिकारी,सदस्य आदींचे सहकार्य लाभले.