Terrible The woman's nose and tongue were cut off as she refused to marry; Shocking incident in Rajasthan

ठाण्याच्या (Thane) कोपरी परिसरात असलेल्या स्पा (Spa)  मध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने छापेमारी करून स्पा चालकाला अटक केली . त्याच्या विरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ठाणे : ठाण्याच्या (Thane) कोपरी परिसरात स्पा च्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविणारे आणि वर्तकनगर परिसरात राहत्या घरात मुलींना ठेवून वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या दोघांच्या विरोधात पिटा अंतर्गत गुन्हे (Crime) दाखल करण्यात आलेले आहेत. तर पाच महिलांची सुटका करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखा उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील (Laxmikant Patil)  यांनी दिली.

ठाण्याच्या कोपरी परिसरात असलेल्या स्पा (Spa)  मध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने छापेमारी करून स्पा चालकाला अटक केली . त्याच्या विरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरीक वेश्याव्यवसायाची धडक कारवाई पोलीस पथकाने वर्तकनगर येथे राहणाऱ्या एका महिलेद्वारे राहत्या घरातच वेश्याव्यवसाय सुरु केल्याने पोलिसांच्या (Police Raid) छापेमारीत पोलिसांनी महिलेला अटक करून तिच्या विरोधात पिटा अंतर्गत गुन्हा दाखल केला.

त्या महिलेच्या घरातून वेश्याव्यवसायात गुरफटलेल्या तिघा महिलांची सुटका करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली. दरम्यान आरोपींच्या नावाबाबत गुप्तता बाळगाण्यात आलेली असलायचेही पोलीस पथकाने सांगितले.