सील केलेल्या कंटेनमेंट झोनमधून विनाकारण ये-जा करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करणार – आयुक्त

कल्याण : कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने काल रात्रीपासून विविध ३२ प्रभागातील कंटेनमेंट झोन सील करण्यात आले आहेत. या झोनमधून मेडिकल व अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण ये-जा

 कल्याण : कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने काल रात्रीपासून विविध ३२ प्रभागातील कंटेनमेंट झोन सील करण्यात आले आहेत. या झोनमधून मेडिकल व अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण ये-जा करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.

कंटेनमेंट झोन सील केल्यावर त्याठिकाणी काय उपाययोजना केल्या आहेत. काय खबरदारी घेतली जात आहे. याची पाहणी करण्यासाठी आयुक्त सूर्यवंशी यांनी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांच्यासोबत जोशीबाग, रामबाग व डोंबिवली परिसरातील सील करण्यात आलेल्या कंटेनमेंट झोनची पाहणी केली.

पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले की, जे कंटेनमेंट झोन सील केले आहेत. त्याठिकाणी लॉकडाऊनच आहे. तो कडकपणे पूर्वीसारखा पाळला जाईल. मास्क न घालणाऱ्या लोकांच्या विरोधात कठोर कारवाई सुरु केली आहे. त्याच प्रकारची कारवाई कंटमेंट झोन सील करण्यात आलेल्या परिसरात केली जाणार आहे. प्रसंगी राज्य राखीव पोलिस दलाची मदत घेतली जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.