jameel sheikh antyatra crowd

जमील शेख यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी राबोडीच्या रस्त्यावर अवघी राबोडी उतरल्याने मृत जमील शेख याची भव्य अंत्ययात्रा(jameel sheikh antyyatra) निघाली.

सुरेश साळवे, ठाणे : सोमवारी दुपारी भर रस्त्यात गोळी डोक्यात घालून करण्यात आलेल्या जमील शेख हत्या प्रकरणाचे(jammel sheikh murder case) गूढ वाढले आहे. अद्याप आरोपी परागंदा असून हत्येचे कारणही अस्पष्ट आहे. तर जमील शेख यांच्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी राबोडीच्या रस्त्यावर अवघी राबोडी उतरल्याने मृत जमील शेख याची भव्य अंत्ययात्रा(jameel sheikh antyyatra) निघाली. दरम्यान ठाणे पोलीस कशोशीने तपास करीत आहेत. तर ठाण्यात जमील शेख हत्या बाबत एकच चर्चेच्या वावड्या उडत आहेत.
मृत जमील शेख याची हत्या होऊन दोन दिवसापेक्षा अधिक काळ उलटला. ठाणे पोलिसांना हत्या करणाऱ्या आरोपींचे सीसीटीव्ही पुटेज ही मिळाले आहेत. मात्र आरोपी अद्याप पोलिसांच्या कक्षेबाहेर आहेत. बुधवारी दुपारी जमील शेख याच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जमील शेख यांच्या अंत्ययात्रेत तब्बल १० हजाराच्या आसपास राबोडीवासी रस्त्यावर आल्याने वाहतुकीचा चक्क जाम झाला होता. लोक मोठ्या संख्येने लोक अंत्ययात्रेत सामील झाले होते. दरम्यान आरोपी मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे जमीलच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केले होते. मात्र जमीलच्या कुटुंबियांशी पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे आणि मनसे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून तिढा सोडविला अन्यथा राबोडीत पुन्हा वातावरण तंग झाले असते.


सोशल डिस्टन्सिंगची ऐशी-तैशी
मृत जमील शेख यांच्या हत्येनंतर अंत्यसंस्कारासाठी अवघी राबोडी रस्त्यावर उतरल्याने तुफान गर्दी झाल्याने वाहतुकीचा चक्का जाम झाला. तर तुफान गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसले. दहा हजाराच्या आसपास नागरिक रस्त्यावर होते. जमीलची हत्या का झाली ? याबाबत जमलेला जनसमुदायामध्ये एकच चर्चा सुरु होती.

पोलिसांची धरपकड सुरु
राबोडीतील हत्या प्रकरणात ठाणे पोलिसांनी खबरे कामाला लावले आहेत. तर संशयितांची धरपकड सुरु असून चौकशा सुरु केल्या आहेत. तर दुसरीकडे हत्येनंतर सुस्पष्ट दिसणारे सीसीटीव्हीचे चलचित्र ही पोलिसांच्या हाताला लागल्याने आता ठाणे पोलिसांची कसोटी लागणार आहे. मात्र पोलिसांनी दाखल तक्रारीच्या अनुषंगाने टॉप्स सुरु केला असून आरोपीपर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. पोलिसांनी हत्येप्रकरणात संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करून सोडल्याची माहिती उपलब्ध आहे. तर पोलिसांनी बुधवारी आणखीन एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांना आरोपी ट्रेस झाले आहेत अन लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. भरदिवसा झालेल्या हत्येमुळे आणि पोलिसांना सीसीटीव्ही सापडल्यामुळे आता ठाणे पोलिसांच्या इभ्रतीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. ठाणे पोलिसांचे सगळे विभाग आरोपींचा शोध घेत आहेत.

क्लस्टर वादातून हत्या
मनसे नेते नितीन सरदेसाईची उपस्थितीराबोडीत झालेल्या हत्येनंतर ठाणे मनसेने आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या. तर हत्या करणारे आरोपी तत्काळ अटक करा अशी मागणीही करण्यात आलेली होती. मृतक जमील हा मनसे प्रभाग अध्यक्ष होता. या हत्येचे गूढ वाढत चालले आहे. हत्ये मागचे कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र मनसेचे अविनाश जाधव यांनी हत्या क्लस्टरच्या वादातून झाल्याचा आरोप केला आहे. बुधवारी मनसैनिक मोठ्या प्रमाणात जमील शेखच्या अंत्ययात्रेत सहभाग होते. तर मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनीही अंत्ययात्रेला उपस्थिती दर्शवून अंत्यदर्शन घेतले.

nitin sardesai in jameel sheikh antyyatra
जमील हत्या प्रकरणात तक्रारदाराने राष्ट्रवादीचे नगरसेवक यांच्या नावाचा उल्लेख करून संशय व्यक्त केला. तसेच तक्रारदाराच्या जबानीत २०१४ च्या जीवघेण्या हल्ल्याबाबत मृत जमील याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक यांच्या नावाचा उल्लेख केला होता. दरम्यान त्यावेळीही पोलिसांनी जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची नार्को टेस्ट करून तपासणी केली होती. मात्र त्यात काहीच निष्पन्न झालेलं नाही. या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी स्पष्ट केले आहे.