उत्तर प्रदेशात जाण्यासाठी पालघरमध्ये मजूरांची गर्दी, सोशल डिस्टंन्सिंगचा उडाला फज्जा

पालघर : पालघर जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या उत्तर प्रदेश राज्यातल्या विस्थापित मजूरांना/कामगारांना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी आज पालघर जिल्हा प्रशासनाकडून पालघर रेल्वे स्थानकातून

 पालघर : पालघर जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या उत्तर प्रदेश राज्यातल्या विस्थापित मजूरांना/कामगारांना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी आज पालघर जिल्हा प्रशासनाकडून  पालघर रेल्वे स्थानकातून वाराणसी, जौनपूर आणि सुलतानपूर साठी ३ श्रमिक ट्रेन सोडल्या जाणार आहेत.

पालघर रेल्वे स्थानकावरून वाराणसी साठी १२ वाजता , जौनपूर साठी ३ वाजता आणि सुलतानपूर साठी ६ वाजता अश्या अनुक्रमे एका पाठोपाठ एक ३ – ३ तासांनी ह्या तीन श्रमिक ट्रेन सोडण्यात येणार आहेत.

त्यामुळे ह्या श्रमिक ट्रेन मध्ये जाण्यासाठी प्रवाश्यांना  कुपन देण्यासाठी आज सकाळी पालघर मधल्या आर्यन स्कुल च्या मैदानावर बोलविण्यात आलं होतं. मात्र प्रशासनाकडून योग्य नियोजन केलं गेलं नसल्यानं लोकं हैरान झाल्याचं चित्र दिसून आलं.

त्यामुळे यावेळी इथं सोशल डिस्टनसिंग काय असतं ते दिसलंचं नाही. आणि इथं सोशल डिस्टनसिंग चा फज्जा उडाला. यावेळी याठिकाणी पालघर चे तहसीलदार सुनील शिंदे देखील उपस्थित होते. तहसीलदार खुद्द उपस्थित असताना अशा प्रकारे सोशल डिस्टनसिंग चा फज्जा उडल्यानं अनके प्रश्न उपस्थित केले जात आहेत.