falguni pathak in kalyan

कल्याणमधील चार व्यावसायिकांनी काल कल्याण पश्चिमेकडील सॉलिटर बँक्वेट हॉलमध्ये संगीत कार्यक्रम(Musical Program Of Falguni Pathak) आयोजित केला होता . या कार्यक्रमाला प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक(Falguni Pathak In kalyan) आल्या होत्या. या कार्यक्रमात गाणी ऐकण्यासाठी नागरिकांनी विशेषतः तरुण तरुणींनी एकच गर्दी केली होती.

    कल्याण : कृष्ण जन्माष्टमीनिमित्त(Krushna Janmashtami In Kalyan) कल्याणमधील चार व्यावसायिकांनी काल कल्याण पश्चिमेकडील सॉलिटर बँक्वेट हॉलमध्ये संगीत कार्यक्रम(Musical Program Of Falguni Pathak) आयोजित केला होता . या कार्यक्रमाला प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक(Falguni Pathak In kalyan) आल्या होत्या. या कार्यक्रमात गाणी ऐकण्यासाठी नागरिकांनी विशेषतः तरुण तरुणींनी एकच गर्दी केली होती. यावेळी गाणी सुरू होताच जमलेल्या लोकांना ना मास्कचे भान राहिले ना सोशल डिस्टन्सिंगचे. कोरोना नियमांची पायममल्ली या कार्यक्रमात झाल्याचे दिसून आले. या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

    सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली असली तिसऱ्या लाटेचा धोका आजही कायम आहे. रुग्ण संख्या कमी होत असल्याने अर्थ व्यवस्था सुरळीत व्हावी म्हणून सरकारने लोकडाऊनमधील निर्बध शिथिल केलेत. मात्र तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका पाहता नागरिकांना मास्क वापरणे, सोशल डिस्टसिंग ठेवणं, अनावश्यक गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र त्यानंतर देखील नागरिकांकडून सुरू असलेली बेफिकिरी ही धोक्याची घंटा ठरू शकते.