कल्याण, डोंबिवलीत कामावर जाण्यासाठी चाकारमान्यांची गर्दी , तर रस्त्यावर वाहतुक कोंडी, सोशल डिस्टंन्सिंगला हरताळ

कल्याण - सोमवार (दि ८ जून) सकाळी रस्त्यावर वाहनांची वाहतुक कोंडी तर सोशल डिस्टनला हरताळ फसल्याचे चित्र कल्याण डोंबिवली शहरात दिसत होते. सोमवार पासुन शासनाने खाजगी कार्यालये

 कल्याण – सोमवार (दि ८ जून) सकाळी रस्त्यावर वाहनांची वाहतुक कोंडी तर सोशल डिस्टनला हरताळ फसल्याचे  चित्र कल्याण डोंबिवली शहरात दिसत होते. सोमवार पासुन शासनाने खाजगी कार्यालये  अनलॉक१  मधील ‘मिशन बिगीन अगेन अंतर्गत सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली. मात्र वाहतूक कोंडी व सोशल डिस्टनला हरताळ फासल्याने अनलॉक१ च्या पहिल्याच दिवशी  फज्जा उडालेला पाहायला मिळाला. त्यामुळे कामावर जाणाऱ्या लोकांसाठी हा पहिला दिवस चांगलाच त्रासदायक ठरला.

अनलॉक १ मधील ३ ऱ्या टप्प्यानुसार आजपासून खासगी कार्यालये अनलॉक १ मधील ३ ऱ्या टप्प्यानुसार  सुरू झाली. त्यामुळे कामावर जाण्यासाठी मोठ्या संख्येने  चाकरमानी वर्ग घराबाहेर पडला त्यात मनामध्ये कोरोनाची धास्ती असताना आजच्या पहिल्या दिवसाचा अनुभव मोठा त्रासदायी ठरला. कल्याण -शिळ मार्ग आणि कल्याण-भिवंडी मार्गावर मोठी वाहतुक कोंडी झालेली पाहायला मिळाली.  याचा फटका चाकरमान्यांना बसला या दोन्ही ठिकाणच्या रस्त्याचे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र संबंधित कंत्राटदाराकडून कोणत्याही प्रकारचे नियोजन केले जात नसल्याने ही वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप वाहन चालकांनी केला आहे. मुळात कल्याण-शिळ रोड आणि कल्याण-भिवंडी रोड या दोन्ही ठिकाणी अत्यंत संथगतीने काम सुरू असून लॉकडाऊन ओपन होणार असल्याने त्यादृष्टीने कंत्राटदाराने उपयोजना करणे आवश्यक होते. तसेच लॉकडाऊनच्या काळातही ज्या गतीने काम होणे आवश्यक होते ने झाले नसल्याने आता याठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याची प्रतिक्रिया वाहन चालकांनी व्यक्त केली. तर पावसाळा सुरू झाल्यानंतर याहून विदारक परिस्थितीला आम्हाला सामोरे जावे लागेल अशी भितीही लोकांनी व्यक्त केली आहे.

पावसाळ्यातील ही गंभीर परिस्थिती टाळायची असेल तर आताच पुढील काही दिवसांत प्रशासनाने त्यासाठी उपाय योजना करण्याची मागणीही यानिमित्ताने जोर धरू पाहत आहे. तसेच डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकामध्ये कामावर जाण्यासाठी बसची वाट पहात असणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी दिसून आली. मात्र याठिकाणी प्रशासनातर्फे कोणत्याही प्रकारे गर्दीचे नियोजन करण्यात न आल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने फज्जा उडल्याचे दिसत होते. इंदिरा चौकातील ही रांग थेट फडके रोडपर्यंत गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी म्हणणे होते.

एकंदरीत अनलॉक १ मिशेन बिगेन अंतर्गत काम सुरू झाल्याच्या  पहिला दिवशी चाकारमान्यांसह लोकांना वाहतुक कोंडी चा फटका व गर्दीमुळे सोशल डिस्टनला हरताळ फसल्याने  मोठ्या त्रासादायक ठरल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत होते.