कल्याणात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस – वाऱ्यामुळे सुमारे ७० झाडे कोसळली

कल्याण : निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातही सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसामुळे कल्याणात सुमारे ७० झाड़े पडल्याची घटना घडली असून सुदैवाने यात जीवितहानी

 कल्याण : निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातही सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसामुळे कल्याणात सुमारे ७०  झाड़े पडल्याची घटना घडली असून सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.निसर्ग चक्रीवादळामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेकडून मंगळवारी पालिका परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. सकाळ पासून रिमझिम पावसाला सुरवात झाली होती. दुपारी २ वाजल्यापासून कल्याण डोंबिवलीत आधी जोरदार वारे वाहु लागल्यानंतर पावसला सुरवात झाली. तर ४  वाजल्यानंतर वाऱ्याची गती मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळली. तर पावसाचा जोरही त्याप्रमाणात वाढलेला दिसला.

हवामान विभागाने मुंबई आणि परिसरात निसर्ग चक्री वादलाचा धोका टळला असल्याची सूचना केली असली तरी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरात ठीक ठिकाणी सुमारे ७० च्या आसपास झाडं उन्मळून पडली असल्याच्या घटना घडल्या असून काही पार्किंगला उभ्या असलेल्या चारचाकींवर देखील झाडं पडल्याने या गाड्यांचे नुकसान झाले. महापालिका अग्निशमन दल ती बाजूला करण्यासाठी अथक प्रयत्न करत असून आज सुमारे २३ झाडे हटविण्यात आली.  तर ३ ठिकाणी रस्त्यावर ऑईल पडले होते. त्याठिकाणी देखील अग्निशमन दलाने योग्य ती खबरदारी घेत ऑईल साफ केले.  तर कल्याणत सकाळ पासून सायंकाळी ७ पर्यंत विद्युत पुरवठा खंडित होता. तर काही भागात  वाहिन्यांवर झाडं पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान सायंकाळी साधारणपणे साडेपाच वाजता पाऊस थांबण्यासह वाराही कमी झालेला पाहायला मिळाला. रायते येथे टिटवाळा शहराला वीज पुरवठा करणाऱ्या वाहिनीवर झाड कोसळल्याने टिटवाळा शहराचा देखील वीज पुरवठा खंडीत झाला होता.