डहाणू ,वाडा, जव्हार भागात दिवसभरात रिमझिम पाऊस – घरावर झाड कोसळण्याची घटना

वाडा: निसर्ग चक्रीवादळाने दिशा बसल्याने पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी भागात नुकसानदायक व जीवितहानी झाली नसल्याची माहिती पुढे येतेय. किनारपट्टी भागात उधाण आणि कमी वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे

 वाडा: निसर्ग चक्रीवादळाने दिशा बसल्याने पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी भागात नुकसानदायक व जीवितहानी झाली नसल्याची माहिती पुढे येतेय. किनारपट्टी भागात उधाण आणि कमी वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील वाडा,जव्हार, डहाणू भागात सर्वसामान्य परिस्थिती राहिली होती.तर काही ठिकाणी झाडे पडल्याची घटना घडून घरांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निसर्ग चक्रीवादळ तयार झाले होते. हे चक्रीवादळ हे कोकण किनारपट्टीला तडाखा देईल असे भाकीत हवामान विभागाकडून वर्तविण्यात येत होती.कोकणातील सिंधदुर्ग,रायगड,मुंबई,ठाणे,आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार आणि अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत होती.या चक्रीवादळाचे  केंद्र रायगड भागात झाल्याने ते वादळ त्याच दिशेने पेन पनवेल या परिसरात  शहापूर असे नाशिक या भागातून निघून गेल्याने पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी व ग्रामीण भागात दिवसभर रिमझिम पाऊस पडत होता. वाडा, जव्हार, या  भागात कुठलीही जीवितहानी व वित्तहानी न झाल्याचे तेथील तहसीलदारांनी दिली. वाडा तालुक्यातील मेट गावात एका घरावर झाड पडून घराचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येतय.तर अन्य ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्याचे सांगितले जाते.
किनारपट्टी भागातील सागरी सुरक्षा उपाययोजना म्हणून डहाणूतील १४०० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते तसेच कुठल्याही प्रकारची जीवित व नुकसानदायक वित्तहानी झाली नसल्याचे  डहाणू तहसीलदार राहुल सारंग यांनी  सांगितले.निसर्ग चक्रीवादळाशी सामना करण्यासाठी एनडीआरएफची टीम पालघर आणि डहाणू किनारी तैनात करण्यात आले होती.अधून मधून समुद्र किनारी भागात लाटा उसळत होत्या. एकंदरीत पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात या चक्रीवादळाचा प्रभाव दिसून आला नाही.