डहाणूमधील ३ वर्षांच्या मुलीचा कोरोना रिपोर्ट तिसऱ्यांदा आला निगेटीव्ह, रुग्णालयाबाहेर टाळ्या वाजवून स्वागत

वाडा: पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील एका ३ वर्षीय मुलीला आज डहाणू उपजिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.तिची कोरोनाची तिसऱ्यांदा केलेली चाचणी निगेटिव्ह आल्याने आज तेथे सहाय्यक जिल्हाधकारी

वाडा: पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील एका ३ वर्षीय मुलीला आज डहाणू उपजिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.तिची कोरोनाची तिसऱ्यांदा केलेली  चाचणी निगेटिव्ह आल्याने आज तेथे सहाय्यक जिल्हाधकारी सौरभ कटीयार,डहाणू तहसीलदार राहुल सारंग, वैद्यकीय कर्मचारी वर्ग उपस्थित होता. तसेच
तिच्या आई आणि वडिलांचा रिपोर्टही निगेटिव्ह आल्याचे सांगण्यात येते. ही पहिली चमुकली आहे की या पालघर जिल्ह्यात कोरोना विरोधात तीव्रपणे लढा दिला आहे. आज तिला रुग्णालयातून सोडण्यात आले तेव्हा तिचे स्वागत टाळ्या वाजवुन आणि फुले देऊन करण्यात आले.
या मुलीचे कुटुंब हे पालघर तालुक्यातील एका गावात विटभट्टी कामावर होते.यात या ३ वर्षीय मुलीला कोरोना संशयित रुग्ण म्हणून ती डहाणू येथे दाखल करण्यात आले होते.तिचा पहिला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. पुन्हा दुसऱ्या चाचणीनंतर तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि तिसरी चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर आज तिला सोडण्यात आले. तिच्या संपर्कातील २०० हून अधिक जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत ते संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. तसेच तिच्या आई वडिलांचा रिपोर्ट हा पहिल्यापासून निगेटीव्ह होता. त्यांना कुठलेही लक्षणे नव्हती मात्र तिच्या संपर्कातील १२ जण हे पॉझिटिव्ह आहेत. हे १२ जण पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आतापर्यंतच्या झालेल्या २०  या संख्येत समाविष्ट आहेत, असे जिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारी सागर पाटील यांनी सांगितले.